मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad News : आईच्या प्रेमापोटी अधिकाऱ्याचं बदललं आयुष्य, निवृत्तीच्या पैशातून उभारलं वृद्धाश्रम, Video

Aurangabad News : आईच्या प्रेमापोटी अधिकाऱ्याचं बदललं आयुष्य, निवृत्तीच्या पैशातून उभारलं वृद्धाश्रम, Video

X
औरंगाबादच्या

औरंगाबादच्या धनराज हजारे यांनी निवृत्तीनंतरच्या पैशातून वृद्धाश्रम उभारलंय. त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण भावनिक आहे.

औरंगाबादच्या धनराज हजारे यांनी निवृत्तीनंतरच्या पैशातून वृद्धाश्रम उभारलंय. त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण भावनिक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhatrapati Sambhaji Nagar [Chhatrapati Sambhaji Nagar], India

सुशील राऊत, प्रतिनिधी

औरंगाबाद, 25 फेब्रुवारी : आयुष्यभर केलेल्या नोकरीच्या निवृत्तीनंतर मिळणारा पैसा प्रत्येक जण आपले पुढील आयुष्य चांगलं व्हावं यासाठी वापरत असतो. पण, औरंगाबादचे धनराज हजारे याला अपवाद आहेत. धनराज यांनी निवृत्तीनंतरच्या पैशातून वृद्धाश्रम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 50 लाख रुपये दिले असून त्यामधून लवकरच वृद्धाश्रमाची इमारत उभी राहणार आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण मोठं भावनिक आहे.

'त्या' घटनेनंतर निर्णय

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील गोदरी हे हजारे यांचे गाव. त्यांनी परळी वैजनाथमधून दहावीचं शिक्षण घेतलं. गुजरातमधील अहमदाबादमधून एमबीए केलेल्या हजारे यांनी एअरपोर्ट अथोरेटी ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ लेखापाल म्हणून मुंबईत 1988 साली नोकरीला सुरूवात केली. अनेक वर्ष मुंबईत काम केल्यानंतर 2021 साली ते विशाखापट्टणम येथून वित्त उपमहाप्रबंधक म्हणून निवृत्त झाले.

हजारे यांचा नोकरीचा सर्वाधिक काळ मुंबईमध्ये गेला. या काळात पत्नी, मुलगा, दोन मुली आणि आई त्यांच्यासोबत होती. नोकरीच्या कालावधीतील तब्बल 25 वर्ष आई त्यांच्यासोबत होती.  त्यानंतर आई गावाकडं गेल्या आणि तिथंच त्यांच निधन झालं. नोकरीच्या काळामध्ये आई सोबत होती मात्र आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिची सेवा न करण्याचं शल्य हजारेंना होतं.

निराधार वृद्धांना 'वात्सल्य' देणारं नाशिकचं सेकंड होम, 11 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा VIDEO

आईच्या उपयोगी आपण आलो नाही तर इतरांची सेवा करावी असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.  विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलांनीही त्यांना क्षणाचाही विचार न करता परवानगी दिली.

धनराज हजारे यांच्या आईचे दहा वर्षांपूर्वी निधन झालं. ऑगस्ट 2016 मध्ये पार्वती बुवाजी हजारे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईची स्थापना केली. सुरुवातीला पालघरमध्ये सेवाभावी संस्था उभारावी असा त्यांचा मानस होता मात्र त्या ठिकाणी त्यांना जमीन मिळाली नाही त्यानंतर त्यांनी मित्रांच्या मदतीने चिकलठाणा परिसरामध्ये त्यांनी वृद्धाश्रमासाठी जागा घेतली 2020 मध्ये बांधकामाला सुरुवात केली किरकोळ काम वगळता बांधकाम पूर्ण आहे.

कसं असेल वृद्धाश्रम?

या वृद्धाश्रमामध्ये 20 जणांची राहण्याची सोय आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी चाळीशीच्या वरील चार दांपत्यांची म्हणजेच आठ जणांच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.  42 बाय 22 चा हॉल तर 25 बाय बाराची किचन यामध्ये आहे.  चार छोट्या खोल्या बेड गाद्या इतर कामांसाठी दोन खोल्या आहेत. त्याचबरोबर स्वच्छतागृह आणि गोडाऊन पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

'या  वृद्धाश्रमात जाती धर्माचे बंधन असणार नाही.  वृद्धाश्रम हे निशुल्क असेल. यामध्ये सर्व सोयी सुविधांसह 24 तास नर्सिंगची व्यवस्था असेल.  निवृत्तीनंतर आता पूर्ण वेळ घरीच असल्यामुळे आम्ही पती-पत्नी दोघं मिळून या वृद्धाश्रमाचे काम बघणार आहोत हे काम करत असताना आम्ही आमच्या आई-वडिलांचे सेवा करत आहोत या भावनेने या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणार असल्याचं धनराज हजारे यांनी सांगितलं.

नोकरीच्या काळामध्ये आमच्या सासूबाई आमच्या सोबत होत्या 25 वर्ष त्या आमच्या सोबत होत्या मात्र शेवटचे काही वर्षे सोबत नसल्यामुळे त्यांची सेवा आमच्याकडून झाली नाही याची खंत  पतीला होती.  त्यांनी आमच्याकडे वृद्धाश्रम सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली मी आणि  मुलांनी क्षणाचाही विचार न करता परवानगी दिली. मी सुद्धा आता त्यांच्यासोबत सेवा करणार असल्याचं धनराज यांच्या पत्नी विजया हजारे सांगतात.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Chhatrapati Sambhaji Nagar, Local18