जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : रिक्षाचालकांना चूक सुधारण्यासाठी 15 दिवसांची डेडलाईन, अन्यथा जम्बो कारवाई

Aurangabad : रिक्षाचालकांना चूक सुधारण्यासाठी 15 दिवसांची डेडलाईन, अन्यथा जम्बो कारवाई

Aurangabad : रिक्षाचालकांना चूक सुधारण्यासाठी 15 दिवसांची डेडलाईन, अन्यथा जम्बो कारवाई

Aurangabad : औरंगाबाद शहरातील रिक्षाचालकांना चूक सुधारण्यासाठी शेवटचे 15 दिवस देण्यात आले असून त्यानंतर त्यांच्यावर जम्बो कारवाई होणार आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 12 ऑक्टोबर :  औरंगाबाद शहरातून प्रवास करत असताना रिक्षांमध्ये प्रवाशांबरोबर फसवणूक किंवा गैरप्रकार  रोखण्यासाठी रिक्षामध्ये क्यू आर कोड लावावेत, असा आदेश RTO विभागाने दिला आहे. या आदेशानंतरही  तब्बल नऊ हजार रिक्षाचालकांनी रिक्षांना क्यू आर कोड बसवलेला नाही. क्यू आर कोडशिवाय फिरणाऱ्या रिक्षा चालकांवर मोठी कारवाई करण्याचा इशारा RTO ने घेतला आहे. शहराची लाईफ लाईन औरंगाबाद शहरातील नागरिकांसाठी रिक्षाही लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. स्वत:चे वाहन नसलेले हजारो नागरिक रोज रिक्षानं प्रवास करतात. याच प्रवासात रिक्षांंमध्ये महिलाची छेड काढणे, आर्थिक फसवणूक करणे हे प्रकार घडल्याचं उघड झाले आहे. यापैकी अनेक रिक्षा या विना क्रमांकाच्या असल्यानं त्यांचा नंतर शोध घेणे कठीण होते. त्यावर उपाय म्हणून परिवहन विभागाकडून सर्व  परिवहन विभागतर्फे शहरातील सर्व रिक्षांना क्यू आर कोड बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. रिक्षा चालकांनी रिक्षामध्ये किंवा आर कोड बसवल्यामुळे संबंधित क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर रिक्षा चालकाची आणि रिक्षाची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर महिला विनयभंग छेडछाड आर्थिक फसवणूक मारहाण सारखे गुन्हे घडण्यावर आळा बसणार आहे. त्यानंतरही शहरातील 9000 रिक्षा विना क्यू आर कोड रस्त्यावर धावत असल्याचं उघड झालं आहे. टेन्शन संपलं! एका क्लिकवर मिळतील मुलांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर, Video डेडलाईन पाळा अन्यथा… ‘शहरातील रिक्षाचालकांना नियमांच पालन करून व्यवसाय करण्याची वेळोवेळी सूचना करण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनेक रिक्षा क्यू आर कोड आणि पासिंग न घेता धावत असल्याचं उघड झालं आहे. आता या रिक्षा चालकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये त्यांनी ही चूक सुधारली नाही तर त्यांच्यावर जम्बो कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी आरटीओ अधिकारी संजय मैत्रवार यांनी दिला आहे. शहरातील प्रत्येक रिक्षाचालक मालकांनी रिक्षा चालवण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. क्यू आर कोड न बसवलेल्या रिक्षाचालकांना आम्ही क्यू आर कोड बसवण्याचा आवाहन करणार आहे.रिक्षाचालक नक्कीच नियमांच पालन करतील, असा विश्वास रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष अस्लम शेख यांनी व्यक्त केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात