Home /News /maharashtra /

Aurangabad : 4 लाख ते 85 लाखांपर्यंत पॅकेज असणारा जाॅब मिळू शकतो; फक्त 'हा' कोर्स करावा लागेल, कसा कराल अर्ज?

Aurangabad : 4 लाख ते 85 लाखांपर्यंत पॅकेज असणारा जाॅब मिळू शकतो; फक्त 'हा' कोर्स करावा लागेल, कसा कराल अर्ज?

BAMU

BAMU

मास्टर इन टूरिज्म अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स करून तुम्ही पर्यटनाच्या डायनामिक इंडस्ट्रीत 4 लाखांपासून 85 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते. BAMU मध्ये टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट या विभागात 15 जुलै प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 26 जून : जगभरामध्ये पर्यटनाचे (Tourism) महत्त्व अधिक आहे. पर्यटन सर्वात वेगाने वाढणारी इंडस्ट्री म्हणून जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळते. यामुळे भारतात आणि भारता बाहेर या पर्यटन व्यवसायात नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला पर्यटनाची आवड असेल व तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर मास्टर इन टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Master in Tourism and Travel Management) हा कोर्स करून तुम्ही पर्यटनाच्या डायनामिक इंडस्ट्रीमध्ये 4 लाखांपासून 85 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते. ते कसे चला तर मग जाणून घेऊया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मास्टर इन टूरिज्म अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा स्वतंत्र विभाग सुरू आहे. गेल्या 28 वर्षापासून हा विभाग विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहे. विभागात तज्ञ शिक्षक त्यासोबत इतर देशातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असते. विभागात 30 विद्यार्थांची क्षमता आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना हवी असणाऱ्या सर्व सुविधा या विभागांमध्ये उपलब्ध आहेत.  मास्टर इन टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला दोन वर्षाचे पदवीत्तर शिक्षण घेता येऊ शकते. प्रवेश प्रक्रिया कशी असेल? तुम्हाला या विभागांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. यासाठी पदवीचे तीन वर्षाचे मार्कशीट, टीसी, मायग्रेशन सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे गरजेचे आहेत. इतर ठिकाणी लाखोंमध्ये असलेल्या कोर्से फीस या विभागातील 2 वर्षाची फीस 10 हजार 800 रुपये आहे. विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियानुसार या विभागाची प्रवेश प्रक्रिया होत असते. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईट व वर्तमानपत्रांमधून मिळेल. प्रवेशापूर्वी सीईटी घेतली जाते. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 जुलै 2022 ते 01 ऑगस्ट 2022 पर्यटन विभागात अंतिम प्रवेश घेता येईल. वाचा : हे खरं टॅलेंट! या मुलांनी बनवलं स्वस्तातलं ऑक्सिजन मशीन; कसं तयार केलं मशीन, पहा VIDEO विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? या विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच विद्यापीठाच्या सुसज्ज होस्टेलमध्ये बाहेर गावातील विद्यार्थ्यांना राहता येऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सुसज्ज ग्रंथालयाचा फायदा देखील विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो. शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे?  1) केंद्र व राज्य शासन पर्यटन विभागात पर्यटन अधिकारी, पर्यटन व्यवस्थापक, उपसंचालक तसेच संचालक म्हणून नोकरी मिळू शकते. 2) एयर इंडिया, इंडिगोमध्ये ड्युटी आँफिसर, व्यवस्थापक 3) पंचतारांकित हॉटेलात व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी 4)  अंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर कंपनी व्यवस्थापक,अधिकारी 5) शिक्षण क्षेत्रात महाविद्यालय विद्यापीठ तसेच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सहायक्क प्राध्यापक, 6) देशातील सर्व CBSE शाळात शिक्षक 7) संशोधन क्षेत्रात रिसर्च आँफिसर, रिसर्च इनवेस्टीगटोर, रिसर्च असोसिएट 8)  नोकरी पेक्षा तुम्ही स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी, टूर ओपरटोर कंपनी सुरु करु शकता. वाचा : Nashik : दहावीनंतर NDA Preparation करण्याची इच्छा आहे? तर भोसला मिलिटरी काॅलेज आहे उत्तम पर्याय : VIDEO विभागातर्फे प्लेसमेंट  मास्टर इन टूरिज्म अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एयर इंडिया, इंडिगो, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ऑरबिटस, टिब्रो, रेडीसन इत्यादी ठिकाणी प्लेसमेंट मिळून दिल्या जातात. 4 लाखांपासून 85 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते.  संपर्कासाठी पत्ता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाशेजारी हा विभाग आहे. विभागाचा ईमेल आयडी head.tourismadmin@bamu.ac.in आहे. तर 9422201955 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.
    First published:

    Tags: Career opportunities, Education, Maharashtra News, जॉब

    पुढील बातम्या