औरंगाबाद, 25 जून : कोरोना (Corona) संसर्गजन्य आजाराने जगात शिरगाव केला आणि संपूर्ण जग ठप्प झालं. या आजारामुळे मानवाच्या शरीरातील ऑक्सिजन झपाट्याने कमी होत होता. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पुरेसा ऑक्सिजनचा साठा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, अशा बातम्या नागरिकांच्या कानावर धडकू लागल्या होत्या. त्यानंतर एकच धांदल उडाली आणि ऑक्सिजन निर्माण करणारे यंत्र (oxygen machine) शोधण्यासाठी नागरिकांनी दुकाने चाळली. मात्र, यंत्राची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखी नव्हती. यामुळे अनेकांना हे यंत्र खरेदी करता आले नाही. ऑक्सिजन अभावी अनेकांच्या जवळच्या नातेवाईकांचा जीव गेला. (Cheap oxygen machine made by students)
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेले ऑक्सिजनचा तुटवडा आणि यामुळे सर्वसामान्यांचा झालेलं नुकसान लक्षात घेऊन औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या तेजस पांडे, कौस्तुभ सोनकुले, नेहाल खान, अनिकेत आढावे आणि वरद जैवाल या 5 विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन निर्माण करणारे यंत्र तयार करण्याचा प्लॅन तयार केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्लॅन शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तात्काळ होकार दिला आणि प्रोजेक्टला सुरुवात झाली.
वाचा : VIDEO : गुजरात दंगलीबाबत 20 वर्षांनी सोडलं अमित शहांनी मौन, सर्व आरोपांना दिलं उत्तर
प्रोजेक्टवर काम करताना विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी आल्या. यात मॅन्युफॅक्चरिंग करताना, सोलेनाइट व्हाल्व ऑपरेट करताना, काही अडचणी आल्या. विद्यार्थ्यांना आलेल्या या अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालयाने इंडस्ट्रितल्या एक्सपर्टसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला. तसेच ऑक्सिजन टेस्टिंग कीट उपलब्ध नव्हती. यासाठी कॉलेजचे संचालक प्रा. डॉ. उल्हास शिऊरकर यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.
...आणि पूर्ण झालं एका वर्षात ऑक्सिजन यंत्र
मेकॅनिकल इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट एका वर्षामध्ये पूर्ण केला. या प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना खर्चदेखील आला. यावेळी कौस्तुभ या विद्यार्थ्याने सांगितलेल्या नुसार हा प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांना एकूण 20 हजार रुपये खर्च आला. 20 हजार रुपये खर्च आल्यानंतर हा प्रोजेक्ट एक वर्षामध्ये पूर्ण करण्यात आला.
वाचा : ‘माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस’; सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट नेमकी कशाबाबत?
हवेतून ऑक्सिजन निर्माण करणार्या यंत्राची निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक साहित्याची गरज पडली. यातील साहित्य पुढीलप्रमाणे कॉम्प्रेसर, सोली नाईड वॉल, रिल्ले, आरडीनो किट, एफआरबी, झिरो लाईट, कॅनिस्टर, वायर आणि नट बोल्ड इत्यादी साहित्य लागले. ऑक्सिजन काॅन्सेटेटर हे यंत्र निर्मिती करताना विद्यार्थांना विभाग प्रमुख प्रा. प्रकाश तौर आणि मार्गदर्शक प्रा. उमेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सर्व संचालक मंडळाचे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन लाभले.
यंत्रांतून होते 95 टक्के शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट, हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे यंत्र आहे. 10 लीटर प्रति मिनिट एवढं ऑक्सिजन निर्मिती करू शकतो. हे यंत्र 95 टक्के शुद्ध ऑक्सिजन निर्माण करते अशी माहिती मार्गदर्शक प्राध्यापक उमेश पाटील यांनी दिली. तसेच गरजेनुसार ऑक्सिजनचा सप्लाय कमी ज्यास्त करता येतो. विभागप्रमुख प्रो.पी. जी. तौर म्हणतात की, "देवगिरी महाविद्यालय नेहमीच सामाजिक विषयांना प्रोत्साहन देत असतं. त्यांचं पहिलं काम हे सामाजिक बांधिलकी आहेत. त्या बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच व्हावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो."
कुठे मिळणार हे ऑक्सिजन मशीन
ऑक्सिजन निर्माण करणारा हा प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रकल्पाची चाचणी करण्यासाठी ऑक्सिजन यंत्राची निर्मिती करणारे कांतीलाल आनी शहा यांच्याकडे केली. मराठवाड्यासाठी गॅस सप्लाय करतात. देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे, प्रोजेक्ट ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मार्केटमध्ये फिंटेक प्रा. लि. चिकलठाणा एमआयडीसी आणि हाय-टेक वैद्यकीय उपकरण उल्कानगरी येथे उपलब्ध आहे.
बाजारात ऑक्सिजन यंत्रांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेरची
बाजारामध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या यंत्रांची किंमत बघितले असता, यंत्रांच्या किमती 50 हजार रुपयांपासून सुरुवात होतात. 50 हजार रुपयांपासून सुरुवात झालेल्या किमती तब्बल दीड लाखांपर्यंत जाऊन पोहोचतात. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या यंत्रांच्या या किमती बघून सर्वसामान्य नागरिकांना या परवडण्यासारखे नाहीत, यामुळे अनेकांना या ऑक्सिजन निर्मिती करणारे यंत्राची खरेदी करता येत नाही. प्रसंगी आप्तस्वकीय गमवावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Students, Successful Stories