औरंगाबाद, 5 जुलै : कोरोनाच्या काळापासून तरुणांसमोर करिअरच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही बीएससी कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण असाल आणि नंतर आयटी क्षेत्रात ( Information technology ) उत्तम करिअर घडवायचे असेल, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्सची (Artificial Intelligence Course) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. काय आहे यामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया? जाणून घेऊया… डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची केंद्रीय पद्धतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागेल. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या विभागात प्रवेश घेण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. पहिली यादी 28 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी नसून मेरिट नुसार प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://www.bamu.ac.in/ अधिकृत संकेतस्थळावरती यासंबंधीची अधिक माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना शक्य असेलतर ते विभागात येऊन देखील यासंबंधी माहिती घेऊ शकतात. वाचा :
ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार कधी पडणार? जयंत पाटलांनी सांगितला महिना फी किती असेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्ससाठी 26 हजार 200 रुपये प्रति वर्ष फीस असेल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपये फीस असणार आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिष्यवृत्यांचा लाभ घेता येईल. या विभागामध्ये 32 विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विभागात 2 वर्षांचा हा कोर्स करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रेवश घेण्यासाठी दहावी, बारावी व बीएससी कॉम्प्युटर सायन्सचे सर्व मार्कशीट टीसी त्यासोबतच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्ससाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागातील आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या प्रयोगशाळांचा वापर विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र हॉस्टेल तयार करण्यात आले आहेत. यासोबतच मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक गरज भागली जावी यासाठी ‘कमवा आणि शिका योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. विद्यापीठात ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बस सेवेचा वापर देखील करता येऊ शकतो. वाचा :
विठ्ठलाच्या भेटीला ‘एकनाथ’, पहिल्यांदाच शिंदेंना मान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार पूजा!
संपर्क कसा कराल? बेगमपुरा परिसरामध्ये पी.इ.एस कॉलेजच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून काही मीटर अंतरावरती संगणक शास्त्र विभाग आहे. मेल आयडी Sachin.csit@gmail.com किंवा 94034 45375 यावर संपर्क करू शकता.
गुगल मॅपवरून साभार…
शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स पूर्ण झाल्यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 6 लाख ते 40 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर, स्वतःचा व्यवसाय, मार्केटिंग, उद्योग इत्यादी ठिकाणी काम करता येते.