मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आज निवडणूक झाली तर...महाविकासआघाडीला इतक्या जागा, आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी

आज निवडणूक झाली तर...महाविकासआघाडीला इतक्या जागा, आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 7 फेब्रुवारी : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. एवढच नाही तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भविष्यवाणी केली आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाविकासआघाडीला 35 जागा मिळतील, असा अंदाज आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये व्यक्त केला आहे.

सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीला यश

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळेल, असा दावा करण्यात आला. याच सर्व्हेचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी महाविकासआघाडीला लोकसभा निवडणुका आज झाल्या तर 35 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला.

या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात एनडीएला (भाजप, शिंदे गट, आरपीआय) फक्त 14 जागा मिळतील, तर युपीएला तब्बल 34 जागा मिळतील, असा दावा करण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये भाजपला एवढा मोठा फटका बसेल असा अंदाज या सर्व्हेमध्ये व्यक्त केला गेला असला तरी केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकारच येईल, असं हा सर्वे सांगतो. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा 10-12 जास्त जागा म्हणजेच 284 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला 298 आणि युपीएला 153 जागा मिळतील, असंही हा सर्व्हे सांगतो.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Shivsena