औरंगाबाद, 05 जानेवारी: मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होतं आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी एसटी बंद असल्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. अशात गरजू प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून आगाऊ प्रवास भाडे वसूल करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. रिक्षाचालक आणि इतर खाजगी वाहन चालकांकडून ठरवून दिलेल्या रेटपेक्षा अधिक प्रवास भाडे आकारले जात आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) मध्यवर्ती बसस्थानक परिसरात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. येथील चार ते पाच रिक्षा चालकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण (rickshaw driver beat passenger) केली आहे. प्रवास भाडे देण्यावर झालेल्या वादानंतर रिक्षाचालकांनी गुंडागर्दी करत प्रवाशाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हा प्रकार घडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. हेही वाचा- Nagpur: माहेरी आली अन् सख्ख्या भावाची ठरली बळी; बहिणीचा तडफडून झाला मृत्यू खरंतर, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने बस बंद आहेत. त्यातही कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होतं आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अशात रिक्षाचालकांकडून आगाऊ प्रवास भाडे आकारून मनमानी कारभार सुरू आहे. आगाऊ भाडं देण्यास नकार दिल्यानंतर, रिक्षा चालक गुंडागर्दी देखील करत आहेत. पुण्यात देखील जास्तीचं प्रवास भाडं आकारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हेही वाचा- सांगलीत 200 रुपयांसाठी सराईत गुंडाचा वाजवला गेम; मित्रांनीच केला खेळ खल्लास अशा रिक्षा चालकांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. अशा प्रवाशांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. पण रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने त्यांची मुजोरी वाढत आहेत. दमदाटी करून प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.