औरंगाबाद, 16 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 262 एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तरुणांचा देखील समावेश आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी समाजामध्ये एचआयव्ही संदर्भात जागरूकता करण्याचे काम सुरु आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने शहर तालुका गाव सर्व स्तरावरती वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे यांनी दिली आहे. जगभरामध्ये एचआयव्ही एड्स हा आजार डोकेदुखी ठरत आहे. एड्सचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये याची विभाजित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गेल्या 9 महिन्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तब्बल 262 एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परत एकदा रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून यात आहे. यामध्ये तरुण वर्गाचा समावेश आहे. शिक्षित तरुणांमध्ये एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती नसेल किंवा एचआयव्ही एड्सला गांभीर्याने घेत नसतील तर ही समाजाची चिंता वाढवणारी गोष्ट आहे, असं साधना गंगावणे सांगतात.
Aurangabad : औरंगाबादमधील लग्नांवर विराट-अनुष्काचा प्रभाव, पाहा Video
एचआयव्ही तपासणी कधी करावी? एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित शरीर संबंध ठेवल्यास गुप्तरोग झाला असल्यास टीबी झाला असल्यास रक्तगट यांचे संक्रमण झाले असल्यास अशी घ्या काळजी असुरक्षित शरीर संबंध ठेवू नये इंजेक्शन घेताना नवीन सुई वापरावी टॅटू काढताना योग्य काळजी घ्यावी जोडीदारा सोबत एकनिष्ठ राहा संयम ठेवा.
Aurangabad: पक्षी निरीक्षणामध्ये आढळल्या 65 प्रजाती, पाहा कोणत्या विदेशी पाहुण्यांची हजेरी
प्रशासनातर्फे समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम वारंवार केलं जात आहे. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तपासणी व मार्गदर्शन केलं जातं. यासाठी गोपनीयता ठेवली जाते नागरिकांनी आणि तरुणांनी काळजी घेतल्यास हा रोग टाळता येऊ शकतो. यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असंही साधना गंगावणे म्हंटल्या.