औरंगाबाद 25 जानेवारी : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) अखेर क्रांती चौकात (Aurangabad Kranti chowk) विराजमान झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास पुतळा बसवण्यात यश आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मागील 40 तासंपासून पुतळा बसवण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. शेवटी क्रेन बदलून हा पुतळा बसवला गेला. रात्री 10 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अथक प्रयत्न करण्यात आले आणि अखेर या प्रयत्नांना यश आलं.
''...मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का?'': शिवसेना
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या क्रांती चौकात वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पुलाखालून येत होता. याच कारणामुळे पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी झाली आणि मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचं काम सुरू झालं.
40 तासांच्या प्रयत्नांनंतर शिवरायांचा पुतळा क्रांतिचौकात विराजमान pic.twitter.com/ss9P82YfOv
— News18Lokmat (@News18lokmat) January 25, 2022
तर पुण्यात पुतळा तयार करण्याचं कामही सुरू होतं. हा पुतळा शुक्रवारी एका मोठ्या ट्रेलरमध्ये औरंगाबादकडे निघाला. अखेर मंगळवारी पहाटे हा पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला. 25 फूट उंच आणि तब्बल 8 टन वजन असलेला हा पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला आहे.
औरंगाबादमध्ये पुतळ्यावरुन राजकारण पेटलं, चंद्रकांत खैरेंचा जलील यांच्यावर निशाणा
1982 मध्ये झालेली पुतळ्याची स्थापना
औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना ही 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांचा हा पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.
शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात विराजमान pic.twitter.com/kEOC1h6Ghz
— News18Lokmat (@News18lokmat) January 25, 2022
हा पुतळा महाराष्ट्रातील सर्वात मोठा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आहे, असं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.