जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद : नामांकित पगारिया ऑटोत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड, 15 लाखांची रोकड केली होती लंपास

औरंगाबाद : नामांकित पगारिया ऑटोत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड, 15 लाखांची रोकड केली होती लंपास

अटक करण्यात आलेले आरोपी

अटक करण्यात आलेले आरोपी

याप्रकरणी गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली आहे.

  • -MIN READ Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 21 सप्टेंबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अत्याचार, बलात्कार यासोबतच चोरीच्याही घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चोरीच्या घटनासंदर्भात औरंगाबादमध्ये पोलिसांनी दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले आहे. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - औरंगाबाद मध्ये नामांकित पगारिया ऑटोमध्ये दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने 15 लाखांची रोकड लंपास केली होती. औरंगाबाद शहरातील पगारिया ऑटो हे सर्वात मोठे वाहन विक्रीचे शोरूम आहे. या शोरुमचा दरवाजा उचकटून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला होता. तसेच पाठीमागील बाजूस असलेल्या दोन तिजोऱ्यातुन तब्बल 15 लाख रुपये पळवून घेऊन गेले होते. हेही वाचा -  Aurangabad : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी अंधांसाठी केलं मोठं काम, वाचून वाटेल अभिमान या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसाच्या गुन्हे शाखेने कसून तपास करत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली आहे. तसेच या चोरट्यांच्या ताब्यातून 4 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

औरंगाबादमध्ये नशेखोर तरूणाचा राडा - औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. काही काळ सिडको भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नशेखाराला पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी मिळून तरुणाला जेरबंद केले. यावेळी संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणत पुढील कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात