जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना उप तालुकाप्रमुखाच्या आत्महत्येमुळं खळबळ, प्रेयसीच्या घरी घेतला गळफास

शिवसेना उप तालुकाप्रमुखाच्या आत्महत्येमुळं खळबळ, प्रेयसीच्या घरी घेतला गळफास

शिवसेना उप तालुकाप्रमुखाच्या आत्महत्येमुळं खळबळ, प्रेयसीच्या घरी घेतला गळफास

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख असणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या (Aurangabad Suicide) केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीच्या घरी त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

सचिन जिरे, औरंगाबाद, 19 मार्च: औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख असणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या (Aurangabad Suicide) केल्याची घटना घडली आहे. सदर तरुण दौलताबादमधील ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीच्या घरामध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सुनिल खजिनदार (Sunil Khajindar) असं या तरुणाचं नाव आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह त्याठिकाणी सापडला होता. मृत्यूचे प्राथमिक कारण आत्महत्या जरी सांगण्यात आले असले, तरी नातेवाईकांना वेगळाच संशय आहे. नातेवाईकांनी दौलताबाद पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे याठिकाणी शेकडोंचा जमाव गोळा झाला आहे. नातेवाईकांनी सुनिलची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी सुनिलच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. या तणाच्या परिस्थितीमध्ये दौलताबादमधील दुकानं, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी परिसरात तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

News18

शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस ठण्यासमोर आणला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. घातपाताचा संशय व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात