सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी)औरंगाबाद, 23 ऑगस्ट: मराठवाड्यात सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जात आहे. मंगळवारी जालना परिसरात कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्यावर आता उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार 30 कोटींचा खर्च करणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जनतेला नैसर्गिक किंवा कृत्रीम कोणत्याही पावसाची अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यात पाऊस पाडल्याचा दावा गुरुवारी कृत्रीम पाऊस पाडणाऱ्या यंत्रणेनं दावा केला. मात्र या पावसावर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.