जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राहुल गांधींवर टीका करणं भाजपच्या अंगाशी, 41 हजारांच्या टी शर्टमुळे BJP अडचणीत

राहुल गांधींवर टीका करणं भाजपच्या अंगाशी, 41 हजारांच्या टी शर्टमुळे BJP अडचणीत

राहुल गांधींवर टीका करणं भाजपच्या अंगाशी, 41 हजारांच्या टी शर्टमुळे BJP अडचणीत

भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचे बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर : मागच्या चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अंतर्गत यात्रा आयोजित केली आहे. राहुल गांधी हे कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विविध राज्यातून भारत जोडो यात्रा नेत आहेत. (Atul Bhatkhalkar) ते सध्या कन्याकुमारीतून केरळमध्ये आले आहेत. दरम्यान त्यांच्या यात्रेच्या सुरूवातीलाच भाजपने त्यांच्यावर टीका करण्याचे सुरू केले आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्त्यूत्तर दिले आहे. यामध्ये भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. परंतु अतुल भातखळकर त्यांच्या ट्वीटर पेजवर सुरूवातील ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे.

जाहिरात

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत, 1971 साली राहुलजींच्या आजीने “गरिबी हटाव” चा नारा दिला होता. देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली, असी खरमरीत टीकाअतुल भातखळकर यांनी केली. यावर काँग्रेससोबत नेटकऱ्यांनी अतुल भातखळकर यांच्या ट्वीटर हँडलवर जोरदार  पलटवार केला आहे.

हे ही वाचा :  आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, हायकोर्टात याचिका दाखल

भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचे बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचे आहे का? असा इशारा काँग्रेससोबत अनेक नेटकऱ्यांनी दिला.

जाहिरात

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजपही याला प्रत्युत्तर देत आहे. यातच राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवरून निशाणा साधला.

भाजपने ब्रँडसोबत राहुल गांधी यांचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केलाय. या टीशर्टची किंमत 41257 रूपये असल्याचा आरोप भाजपने केलाय. यावर भाजपने जोरदार घणाघात ‘भारत देखो’ असे म्हटलेय. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

जाहिरात

हे ही वाचा :  शिंदे गटाचा एक आमदार होणार कमी? सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे आमदारकी धोक्यात!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात