Home /News /maharashtra /

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कोल्हापुरात कुटुंबाने महिलेसोबत केली लाजीरवाणी गोष्ट

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कोल्हापुरात कुटुंबाने महिलेसोबत केली लाजीरवाणी गोष्ट

कोल्हापूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

कोल्हापूर, 13 जून : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून महिलेचं मुंडन केल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. 'तुझं वागणं बरोबर नाही असं म्हणत पती,सासू आणि दिराने विवाहितेचं मुंडन केलं. कात्री आणि दाढी करण्याच्या साहित्याने महिलेचं मुंडन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पती मनोज बागडी, सासू शांताबाई बागडी आणि पिंटू उर्फ गणपती बागडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. हेही वाचा - 80 वर्षांच्या नराधमाचे संतापजनक कृत्य, दोन अल्पवयीन बहिणीवर केले अत्याचार तृप्ती देसाईंकडून निषेध व्यक्त 'जो कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ओळखला जातो, तिथं ही संतापजनक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून महिलेचं मुंडन केल्याची ही धक्कादायक घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या आरोपींना तातडीने शिक्षा देण्यात यावी,' अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या