ठाणे, 01 डिसेंबर : अनधिकृत फेरिवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई करत असताना एका फेरिवाल्याने ठाणे महानगरपालिकेच्या सह्हायक (Thane Municipal Corporation Commissioner) आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना आपली बोटे गमवावी लागली होतीय याच कल्पिता पिंपळे आता पुन्हा सेवेत रुजू झाल्या असून आपण पुन्हा जनतेच्या सेवेकरता तयार आहोत, असं जाहीर करत कल्पिता पिंपळे यांनी ठाणे महानगरपालिकेत आज 3 महिन्यांनी ठाणे महानगर पालिकेत पाऊल ठेवले.
कल्पिता पिंपळे यांच्याकडे पुन्हा सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार असून अनिधिकृत फेरीवाला आणि अनधिकृत बांधकाम या विरोधात कल्पिता पिंपळे या पुन्हा एकदा धडक कारवाई करणार आहेत. ३० ॲागस्ट २०२१ या दिवशी सेवेवर असताना माजीवडा भागांत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. ही कारवाई करत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कल्पिता पिंपळे यांनी धडक कारवाईला सुरुवात केली होती.
हेच कार्य करत असताना माजीवडा येथे अमरजीत नावाच्या एका माथेफिरु अनधिकृत फेरीवाल्याने कल्पिता पिंपेळ यांच्यावर मागून हल्ला चढवला. सुरुवातीला धक्काबुक्की करत होता पण अचानक तो इतका हिंसक झाला की, त्याने त्याच्या जवळील धार धार शस्त्राने हल्ला केला तो हल्ला परतवून लावत असताना त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे त्यात छाटली गेली. तरी देखील हल्लेखोर कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करतच होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर जखम झाली तसंच त्यांच्या डोक्यात देखील अमरजीतने हल्ला केला.
तसंच, कल्पिता पिपंळे यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर ही अमरजीतने हल्ला केला ज्यात त्यांचे ही एक बोट छाटले गेले. जवळपास ५-६ मिनिटे चाललेल्या हल्यात कसं बसं पिंपळे यांनी अमरजीतच्या तावडीतून सोडवण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश आले आणि त्यांनी वेळ न दवडता त्यांची तात्काळ वेदांत हाॅस्पिटलमध्ये रवानगी केली. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांना हाताची बोट गमवावी लागली.
हे उपचार घेवून पुर्णपणे बरे होवून दोघेही आज पुन्हा सेवेत रुजू झाले असून सोमनाथ पालवे यांनाच कल्पिता पिंपळे यांचा सुरक्षारक्षक म्हणून पुन्हा नेमण्यात आले असून कल्पिता पिंपळे यांना पुन्हा सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. आता सिंघम लेडी कल्पिता पिंपळे या पुन्हा धडक कारवाई करणार असून त्या अनधिकृत फेरीवाले मुक्त ठाणे करणार आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.