• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दिवाळीनिमित्त आशिष शेलार मित्राला भेटण्यासाठी पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरेंना दिलं पुस्तक Gift

दिवाळीनिमित्त आशिष शेलार मित्राला भेटण्यासाठी पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरेंना दिलं पुस्तक Gift

दिवाळीनिमित्त भाजपाचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आपल्या मित्राची भेट घेतली आहे.

 • Share this:
  मुंबई, 05 नोव्हेंबर: दिवाळीनिमित्त भाजपाचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आपल्या मित्राची भेट घेतली आहे. हे मित्र दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्र (president of Maharashtra Navnirman Sena) नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आहेत. राज ठाकरेंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्रीबद्दल सर्वांनाच माहित आहे. दरवर्षी आशिष शेलार राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर येत असतात. आजही शेलार सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये भेट झाली. दिवाळी फराळ घेत दोघांनीही गप्पा मारल्याचं समजतंय. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना या भेटीदरम्यान एक पुस्तकही भेट दिलं आहे. भेटीवर काय म्हणाले आशिष शेलार दिवाळी निमित्त मित्राला भेटायला आलो होतो. पेग्विन पब्लिकेशनचं जागतील 100 नावाजलेल्या चित्रपटांवर आधारित एक पुस्तक माझ्या पाहण्यात आले होते. ते द्यावे आणि प्रकृतीच विचारपूस करावी यासाठी आलो होतो. हेही वाचा- पवार कुटुंबाची आगळीवेगळी दिवाळी, अजित पवार गैरहजर; समोर आलं 'हे' कारण Raj Thackeray यांचं नवं घर आज राज ठाकरे आपल्या नव्या घरात (New House) गृहप्रवेश करणार आहेत. दादर येथील कृष्णकुंज हे राज ठाकरे यांचं घर. राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळं आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख बदलणार आहे. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार असल्याचं समजतंय. मात्र राज ठाकरेंनी या घराला अद्याप नाव दिलं नाही आहे. मात्र कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचं नवं घर असणार आहे. हेही वाचा- इंधन दर कपातीवरुन शिवसेनेनं BJP वर साधला निशाणा पाडव्यानिमित्त राज ठाकरे सहकुटुंब या नव्या घरात गृहप्रवेश करतील. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचं झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात. कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. या नव्या घराच्या इमारतीचं काम आता पूर्ण झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे कोरोनामुक्त 30 ऑक्टोबरला राज ठाकरेंचे कोरोना (Corona Virus Test Report) चाचणी रिपोर्ट आले त्या रिपोर्टनुसार, राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचं समजलं. राज ठाकरेंची 29 ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचं समजलं. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहिण देखील कोरोना मुक्त झाल्या आहेत. 23 ऑक्टोबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Raj Thackeray corona test positive) आला होता. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या (Lilavati Hospital) डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले.
  Published by:Pooja Vichare
  First published: