Home /News /maharashtra /

....आणि अजान सुरू होताच अजितदादांनी थांबवलं भाषण, राज ठाकरेंना सुनावले खडेबोल

....आणि अजान सुरू होताच अजितदादांनी थांबवलं भाषण, राज ठाकरेंना सुनावले खडेबोल

 बोलणाऱ्यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवारसाहेबांनी राजकारण क्षेत्रात काम केले आहे.

बोलणाऱ्यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवारसाहेबांनी राजकारण क्षेत्रात काम केले आहे.

बोलणाऱ्यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवारसाहेबांनी राजकारण क्षेत्रात काम केले आहे.

येवला, 02 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery sabha aurangabad) यांच्या औरंगाबाद सभेदरम्यान अजान सुरू असताना त्यांनी थेट पोलिसांना भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे, आज येवल्यात अजान सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आपलं भाषण थांबवलं. 'ही आपली संस्कृती असून आपण सर्व धर्माचा आदर करतो' असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंना टोला लगावला. येवल्यातील अतिशय महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी बोलत असताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी भोंग्याच्या वादावरून मनसेवर जोरदार टीका केली. छगन भुजबळ यांच्या भाषणानंतर अजित पवार हे भाषणासाठी उभे राहिले होते. त्यावेळी सभेच्या बाजूला असलेल्या मशिदीतून अजान सुरू झाली. अजान सुरू होताच दादा नी भाषण थांबवलं.  'ही आपली संस्कृती असून आपण सर्व धर्माचा आदर करतो' असं म्हणत अजितदादांनी भाषणाला सुरुवात केली. (होणाऱ्या जावयाने मेव्हणीला नेलं पळवून, मुलीच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय) 'काही लोकांना आताचं का भोंगे आठवले.  शरद पवार यांना जातीयवादी ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. बोलणाऱ्यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवारसाहेबांनी राजकारण क्षेत्रात काम केले आहे. आज जे बोलताय त्यांनी एखाद्या कारखाना काढून लोकांना रोजगार दिले. एखादी टरबूज-खरबूज सोसायटी देखील काढली नाही, असा सणसणीत टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला. 'योगी आदित्यनाथ यांनी असं केलं तसं केलं सांगितले जात आहे त्यांनी केवळ मशिदीवरील भोंगे बंद केले नाही तर मंदिरावरील भोंगे देखील बंद केले हे सांगितले जात नाही, अशी टीकाही अजित पवारांनी केली. 'आपल्याकडे काकड आरती, जागरण गोंधळ यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. त्यात भोंगे वापरले जातात कुणीही कोणाबाबत तक्रार केली नाही. महागाई,बेरोजगारी वाढली या बाबत कधी काहीही बोलले नाही. दुपारी कधी सभा घेतली का? कष्ट केले का? रात्री थंड हवेत सभा घेतात. राजकीय स्वार्था पोटी समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली. (Eid mubarak 2022 Messages : रमजान ईदच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज) 'शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे रक्तात आहे आम्हाला शिवाजी महाराज शिकवू नका. फक्त नक्कल केल्या जातात, नक्कल करून कोणी नेता होत नाही, असा सणसणीत टोलाही अजितदादांनी राज ठाकरेंना लगावला. फुले, शाहु,आंबेडकर यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? भुजबळांचा राज ठाकरेंना टोला तर, लोकमान्य टिळकांचा त्याग मोठा आहे. तो विसरता येऊ शकत नाही मात्र त्यांच्या नावाने खोटा इतिहास सांगितलं जात आहे दिल्लीपासून महाराष्ट्राप्रर्यंत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.  राज ठाकरे साहेब,  उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला. शरद पवार शिवाजी महाराजांचा नाव घेत नसल्याचा आरोप राज ठाकरे करतात, आम्ही तर त्यांचा नाव नेहमीच घेतो मात्र तुम्ही फुले, शाहु,आंबेडकर यांचा नाव का घेत नाही त्यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला. भिडे गुरुजी यांनी नेहमीच मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतली मात्र सायकलवरून पडल्यानंतर त्यांचा ऑपरेशन एका मुस्लिम डॉक्टराने केलं ही महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृती आहे, असंही भुजबळ म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या