जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर

Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लग्न करताना अरेंज मॅरेज करावं की लव्ह मॅरेज असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 9 जून, उदय तिमांडे :  भारतीय विवाह संस्था ही जगात श्रेष्ठ मानली जाते. आई वडिलांच्या, परिवाराच्या संमतीने केलेला विवाह हा टिकतो असं समजलं जातं, त्याउलट प्रेम विवाहाची परिणीती वादात होऊन, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं असा समज आहे. पण नागपूरच्या भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारी पाहिल्यास धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम विवाहापेक्षा अरेंज मॅरेज मध्येच पती- पत्नीत जास्त भांडण होत असल्याचं समोर आलं आहे. एक नजर आकडेवारीवर  1 जानेवारी ते 15 मे 2023 पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार प्रेम विवाहाचे 310 वाद भरोसा सेलकडे आले आहेत, तर अरेंज मॅरेजचे तब्बल 608 वाद भरसा सेलकडे आले आहेत. 2022 मधील आकडेवारीनुसार प्रेमविवाहाचे 789 प्रकरणं तर अरेंज मॅरेजचे 1560 प्रकरणं भरोसा सेलकडे आले आहेत. याचाच अर्थ विवाहाच्या एकूण तक्रारीपैकी सुमारे 67 टक्के तक्रारी या अरेंज मॅरेजच्या आहेत. तर 33 टक्के तक्रारी या लव्ह मॅरेजच्या आहेत. तक्रारींची दखल घेण्याचे आदेश   ‘भरोसा सेल मध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी या डोळ्यात अंजन टाकणाऱ्या असून बदलत्या काळानुसार विवाह संस्थेतील बदल स्वीकारले नाही तर त्याची परिणीती वादात होऊन त्याचा परिणाम परिवारावर होतो, त्यामुळे भरोसा सेलमध्ये आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याची सूचना पोलीस विभागाला दिल्या असल्याची माहिती महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी दिली आहे. अरेंज मॅरेजचं प्रमाण अधिक  दरम्यान भरोसा सेलकडे आलेल्या आकडेवारीनुसार प्रेम विवाह जास्त यशस्वी होत असल्याचं जरी समोर आलं असलं, तरी  प्रेम विवाहाच्या तुलनेत अरेंज मॅरेज करणाऱ्यांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: marriage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात