Home /News /maharashtra /

Anil Parab: अनिल परबांच्या अडचणीत वाढ? वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीचं दापोलीत धाडसत्र, मुरुड ग्रामपंचायतीतून कागदपत्रे ताब्यात

Anil Parab: अनिल परबांच्या अडचणीत वाढ? वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीचं दापोलीत धाडसत्र, मुरुड ग्रामपंचायतीतून कागदपत्रे ताब्यात

अनिल परब अडचणीत? रिसॉर्ट प्रकरणी ईडीचं धाडसत्र, मुरुडमधून कागदपत्रे ताब्यात

अनिल परब अडचणीत? रिसॉर्ट प्रकरणी ईडीचं धाडसत्र, मुरुडमधून कागदपत्रे ताब्यात

Anil Parab: वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणात आता अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी मुरुड, 28 मे : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार आरोप करत होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी (19 मे) अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड (Ed raids) टाकली. अनिल परब यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्याच दरम्यान आता कोकणातून एक मोठी बातमी आली आहे. वादग्रस्त साई रिसॉर्ट (Controversial Sai Resort) प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्टवर धाड टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरुड ग्रामपंचायतीमधून रिसॉर्टच्या संबंधातील कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत साई रिसॉर्टच्या संबंधीत काही कागदपत्रे सादर केली होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. वाचा : ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले? साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांचा आरोप काय? साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. वाचा : "देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी" ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टची बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परबने सदानंद कदमला 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला. डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचे घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Anil parab, Dapoli, ED

    पुढील बातम्या