मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनंतर आता 'या' बड्या मंत्र्याचा नंबर, किरीट सोमय्या आणि नितेश राणेंचा दावा

Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनंतर आता 'या' बड्या मंत्र्याचा नंबर, किरीट सोमय्या आणि नितेश राणेंचा दावा

अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजपच्या नेत्यांकडून पुढील कारवाई कुणावर होणार याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील अनिल देशमुखांच्या अटकेबाबत (Kirit Somaiya on Anil Deshmukh Arrest) तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 02 नोव्हेंबर: खंडणी वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest Update) यांना अटक केली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान या अटकेनंतर भाजपच्या नेत्यांकडून पुढील कारवाई कुणावर होणार याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील अनिल देशमुखांच्या अटकेबाबत (Kirit Somaiya on Anil Deshmukh Arrest) तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

'अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब', अशी कॅप्शन देत सोमय्या यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आता या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टेन्शन वाढेल. त्यांनी असाही आरोप केला आहे की दरमहा 100 कोटीची वसुली व्हायची त्यातील पवार यांच्याकडे किती आणि ठाकरे सरकारकडे किती पैसे जायचे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

दरम्यान केवळ किरीट सोमय्याच नाही तर भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane on Anil Deshmukh Arrest) अनिल देशमुखांसह अनिल परबांवर प्रहार केला आहे. अनिल देशमुखांच्या अटकेनंतर त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, 'अनिल देशमुख.. हॅप्पी दिवाळी! अनिल परब.. मेरी ख्रिसमस?? नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे विशेष आभार'. अर्थात अनिल देशमुखांनतर अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी देखील केला आहे.

अनिल देशमुख यांना ED ने केली अटक

100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी (Anil Deshmukh Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.

अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली

First published:

Tags: Anil deshmukh, Anil parab, Kirit Somaiya, Money laundering, Nitesh rane