जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri Bypoll result : ...तर भाजपला तितकीच मतं मिळाली असती, अंधेरीतल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Andheri Bypoll result : ...तर भाजपला तितकीच मतं मिळाली असती, अंधेरीतल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Andheri Bypoll result : ...तर भाजपला तितकीच मतं मिळाली असती, अंधेरीतल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 नोव्हेंबर : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांना 66,530 मतं मिळाली. ऋतुजा लटके यांच्या खालोखाल नोटाला 12,806 मिळाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक होत होती. उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवलं, पण अखेरच्या क्षणी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या विनंतीनंतर भाजपने उमेदवार मागे घेतला. भाजपने उमेदवार मागे घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असला तरी या निवडणुकीत नोटाला मिळालेल्या एवढ्या मतांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, पतीच्या आठवणीने झाल्या भावुक उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया निवडणुकीच्या निमित्ताने आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मदतीने चिन्ह गोठवलं ती लोक आसपासही फिरकली नाही. मात्र, त्यांचे कर्ते करवते त्यांनी पहिला अर्ज भरला. त्यानंतर त्यांना अंदाज आला आणि माघार घेतली. पण जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर नोटाची मतं त्यांना मिळाली असती, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. या निवडणुकीमध्ये नोटाचा वापर झाला. मला त्यांच्याबद्दल आता काहीच बोलायचं नाही. त्यांच्याकडून आता काही अपेक्षा नाही. अधिकृत निवडणूक लढवली असती तर नोटाला जितकी मत मिळाली तितकी मत भाजपला मिळाली असती, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक चिन्ह महत्त्वाचं आहे. शिवसेनाप्रमुख ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे ते अजूनही मातोश्रीवर त्यांच्या खोलीमधील देव्हाऱ्यामध्ये आहे. ते चिन्ह गोठवलं गेलं. चिन्ह कुठलं असलं तरी जनता ही आम्हाला मतदान करत असते, हे आता सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. विजयाचं श्रेय कुणाला? मधल्या कपट कारस्थानानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. आमचं पक्षचिन्ह गोठवलं याचं दुख आहे. मशाल चिन्ह मिळालं, मशाल भडकली आणि भगवा फडकला. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना आहेच, आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी बिग्रेड आणखी सुद्धा हितचिंतक आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. आता लढाईची सुरुवात ही विजयाने झाली आहे. सगळे मिळून एकत्र लढलो आणि विजय झाला. यापुढेही सगळे एकत्र मिळून लढणार आहोत आणि विजय खेचून आणू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात