जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon Crime : धक्कादायक ! चोरीसाठी चक्क वृद्ध महिलेचे कान कापले, जळगावातील घटनेने खळबळ

Jalgaon Crime : धक्कादायक ! चोरीसाठी चक्क वृद्ध महिलेचे कान कापले, जळगावातील घटनेने खळबळ

Jalgaon Crime : धक्कादायक ! चोरीसाठी चक्क वृद्ध महिलेचे कान कापले, जळगावातील घटनेने खळबळ

अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर (जळगाव), 31 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील ह्या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा घरात चोरीच्या इराद्याने घुसला. दरम्यान, विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या. अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसून कानातील सोने काढून घेण्यासाठी थेट वृध्द महिलेचा कानच कापला.  

जाहिरात

हे ही वाचा :  5 मुलांची आई असलेल्या महिलेचं धक्कादायक कृत्य; नववीतील मुलाचं अपहरण करून लैंगिक अत्याचार

तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला. दरम्यान आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला. जखमी झालेल्या वृध्द महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील रेल गावच्या रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय-70) ह्या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहे. 29 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा घरात चोरीच्या इराद्याने घुसला. दरम्यान, विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात घुसून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने असल्याने त्याने थेट वृध्द महिलेचा कानच कापला.  

जाहिरात

हे ही वाचा :  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, ठाकरे गटावर आरोप

तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून चोरटा पसार झाला. दरम्यान, सकाळी 9 वाजले तरी आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात