लखनऊ 29 डिसेंबर : एका विवाहित महिलेनं 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित महिलेविरोधात बलात्कार, अपहरण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, पीडित मुलाची सुटका करण्यात आली आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ ने याबाबत वृत्त दिलंय. महिलांसोबत बलात्कार झाल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. पण उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये याच्या उलट घटना घडल्याचं समोर आलं. येथे पाच मुलांची आई असणाऱ्या एका विवाहित महिलेनं नववीला शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार केला. पीडित मुलाला आरोपी महिलेनं एप्रिल 2022 मध्ये स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचं अपहरण केलं होतं. त्यावेळी पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यानं पीडित मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल चित्रकूटमधील राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे की, ‘माझा मुलगा अवघा 14 वर्षांचा असून, तो नववीत शिकतो. आरोपी महिला आमच्या शेजारी राहते. ती विवाहित असून, पाच मुलांची आई आहे. आरोपी महिलेनं माझ्या मुलाला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि 18 एप्रिल 2022 रोजी त्याच्यासोबत पळून गेली. याबाबत मी तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलो होतो. मात्र कारवाई तर दूरच, पोलिसांनी तक्रारही घेतली नाही. त्यामुळे न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला.’ दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून राजापूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि आरोपी महिलेचा शोध घेत तिला अटक केली. तसंच तिनं अपहरण केलेल्या पीडित मुलाचीदेखील पोलिसांनी सुटका केली. पीडित मुलाची मेडिकल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध बलात्कार, अपहरण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासात संबंधित पीडित मुलाने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. Pune Crime News : स्वत:च्या मृत्यूचा बनाव करत प्रेयसीसोबत पळाला, घरच्यांनी दशक्रिया विधीही उरकला, पण पुढे… आरोपी महिलेनं पीडित मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. ती अनेकदा त्याच्यासोबत अश्लील कृत्ये करीत होती. एकेदिवशी तिने त्याला अपहरण करून प्रयागराजला नेलं. तिथे तिने भाडोत्री घर घेतलं, आणि त्याला वारंवार नशेचे पदार्थ देऊन त्याच्यावर बलात्कार केला. संबंधित पीडित मुलाने आरोपी महिलेला अनेकदा विरोध केला, परंतु महिलेनं त्याला दमदाटी केली, असंही पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय. पीडित वडिलांची सुरुवातीला तक्रार न घेतल्यामुळे राजापूर पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.