मुंबई, 15 जानेवारी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी ट्विटरवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज अमृता फडणवीस यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. तसेच तिळगूळ घ्या गोडगोड बोला, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे ! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तसेच पतंग उडवतानाचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, नुकत्याच त्या ‘आज मैने मूड बना लिया है..’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी स्वतः डान्स आणि अभिनय केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमृता या गाण्याचं प्रमोशन करत होत्या. हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष… अमृता फडणवीस यांच्या शैक्षणिक क्षेत्राबाबत सांगायचं तर, त्या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे. तसेच अमृता फडणवीस सतत मुलाखतींमध्ये आपल्या लग्नाबाबत आणि आपल्या कुटुंबाबत किस्से शेअर करत असतात.