अमरावती, 14 फेब्रुवारी : ‘मुलाने-मुलांसोबत आणि मुलीने-मुलीसोबत लग्न करणे आपली संस्कृती नाही. लिव्ह इन रिलेशनशिप काय असते कधी मी ऐकलं नव्हतं, मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलीनं सोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठून आलं, असं वक्तव्य अमरावतीत खासदार नवनीत राणां यांनी केलं आहे. जगभरात व्हेंलटाईन दिवस साजरा केला जात आहे. सर्वांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशातच अमरावतीच्या खासदार रवी राणा यांनी एक मोठं विधान केलं आहे.
‘मी सुद्धा याच पिढीची आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हे कधी ऐकलं नाही. आई-वडिल मुलांना शिक्षणासाठी पाठवतात आणि मुलं-मुली एकत्र राहतात. मुलं-मुलासोबत लग्न करत आहे आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे. ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीत आली आहे, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितीत केला आहे. ‘मी सोशल मीडियावर पाहते, मला हे कुठे तरी दुखत आहे. ही गोष्ट आली कुठून? आपल्या मोठं करण्यासाठी आई-वडिलांनी हाडाचं पाणी केलं. पैसे कमावयाला लागलो आणि डोक्याचं वर घ्यायचं हे योग्य नाही. आई-वडिलांनी आपले कर्तव्य पार पाडले. आता समाज म्हणून आपण काय करतो, समाजाने आपल्याला नाव दिले आहे, त्यामुळे समाजाला काही तरी दिले पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या शेतीसाठी राहतो. पण, 10 टक्के समाजासाठी काही तरी दिलं पाहिजे, असं आवाहनही रवी राणांनी केलं. आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह इन मध्ये राहतात. पैसे जास्त झाले म्हणून डोक्याच्या वर घ्यायचं हे आपली संस्कृती नाही. आई वडील कर्तव्य पार पाडतात त्यामुळे मुलांनी आपलं कर्तव्य पार पडलं पाहिजे, असा सल्लाही नवनीत राणा यांनी दिला आहे.