मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shakuntala Railway Line : या रेल्वे मार्गासाठी भारतीय रेल्वे अजूनही ब्रिटिशांना पैसे देते का? रेल्वेने केला महत्त्वाचा खुलासा

Shakuntala Railway Line : या रेल्वे मार्गासाठी भारतीय रेल्वे अजूनही ब्रिटिशांना पैसे देते का? रेल्वेने केला महत्त्वाचा खुलासा

भारतीय रेल्वेने शकुंतला रेल्वे मार्गाबाबत मोठा खुलासा केला आहे.

भारतीय रेल्वेने शकुंतला रेल्वे मार्गाबाबत मोठा खुलासा केला आहे.

भारतीय रेल्वेने शकुंतला रेल्वे मार्गाबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 मार्च : यवतमाळ आणि मूर्तिजापूर दरम्यान ब्रिटीश राजवटीत शकुंतला रेल्वे नावाच्या 190 किमी लांबीच्या नॅरो गेज रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्यासाठी भारत ब्रिटिशांना 1 कोटी रुपये देतो, अशी माहिती समोर आली होती. मात्र, यानंतर भारतीय रेल्वेनेच मोठा खुलासा केला आहे.

भारतीय रेल्वेने काय म्हटलं -

यवतमाळ आणि मूर्तिजापूर दरम्यान ब्रिटीश राजवटीत शकुंतला रेल्वे नावाच्या 190 किमी लांबीच्या नॅरो गेज रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्यासाठी भारत ब्रिटिशांना 1 कोटी रुपये देतो, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या मार्गावर सध्या कोणतीही ट्रेन सेवा चालत नाही. तसेच यासाठी कोणेतही पैसे देण्यात येत नाही, असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी सुतार म्हणाले की, हे वृत्त बरोबर नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. नॅरोगेज लाइन भारतीय रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आली आहे. रेल्वे आता कंपनी/ब्रिटिशांना काहीही पैसे देत नाही. तसेच शकुंतला रेल्वे मार्गावर (मुर्तजापूर-अचलपूर आणि मुर्तजापूर-यवतमाळ) कोणतीही रेल्वे सेवा धावत नाही. शिवाय, शकुंतला रेल्वे गेज रूपांतरण (नॅरो टू ब्रॉड गेज) FLS (अंतिम स्थान सर्वेक्षण) ऑक्टोबर 2022मध्ये मंजूर करण्यात आले आहे आणि एलओए (LOA) जानेवारी 2023 मध्ये जारी करण्यात आले आहे.

कोलोनिअल काळात संपूर्ण मध्य भारतात धावणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (GIPR) या ट्रॅकवर ट्रेन चालली. मात्र, 1952 मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. 1910 मध्ये किलिक-निक्सन या खासगी ब्रिटिश कंपनीने शकुंतला रेल्वेची स्थापना केली होती.

1921 मध्ये मँचेस्टरमध्ये बांधण्यात आले आणि शकुंतला रेल्वे 1923 पासून 70 वर्षांहून अधिक काळ वापरली गेली. 15 एप्रिल 1994 रोजी मूळ इंजिन बदलण्यासाठी डिझेल मोटर बसवण्यात आली. भारतातील ब्रिटीश वसाहती प्रशासनासह कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांचे परिणाम म्हणून सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीची (CPRC) स्थापना झाली होती.

नॅरोगेज रेल्वेचा उद्देश यवतमाळ ते मुंबई (बॉम्बे) कापूस वाहतूक करणे हा होता. यानंतर तो इंग्लंडमधील मँचेस्टरला पाठवला गेला. दरम्यान, यापूर्वी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यवतमाळ-मुर्तिजापूर-अचलपूर रेल्वे मार्गाचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी 1,500 कोटी मंजूर केले होते. सध्या अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यान रेल्वेने 190 किमीचा प्रवास करण्यासाठी 20 तास लागतात.

दरम्यान, आता शकुंतला रेल्वे नावाच्या 190 किमी लांबीच्या नॅरो गेज रेल्वे मार्गावर सध्या कोणतीही ट्रेन सेवा चालत नाही. तसेच यासाठी कोणेतही पैसे देण्यात येत नाही, असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.

First published:
top videos

    Tags: Amravati, Central railway, Indian railway, Railway, Railway Budget, Railway tracks