मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Food Poisoning Student : मोठी बातमी! शिर्डीला सहलीला गेलेल्या 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Food Poisoning Student : मोठी बातमी! शिर्डीला सहलीला गेलेल्या 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India

अहमदनगर, 17 फेब्रुवारी : शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवळपास 88 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

हे  ही वाचा : भाजपाला 'ती' चूक भोवणार; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांची मोठी भविष्यवाणी

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली होती. इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी सहलीला आले होते. सर्व विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती.

सहलीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली नेवासा येथे ज्या ठिकाणी विद्यार्थी थांबले होते, त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी जेवण करण्यात आले होते. काल रात्री जेवण केल्यानंतर 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला होता.

हे ही वाचा : Rudraksh Mahotsav : रुद्राक्ष महोत्सवाला गेलेल्या मालेगावच्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू

दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत डाॅ. प्रितम वडगावे यांनी माहिती दिली आहे. रात्री अकरा वाजता शिर्डीतील रूग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची डाॅक्टरांची माहीती दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Amravati, School student, Shirdi (City/Town/Village), Shirdi news, Students