अमरावती, 29 एप्रिल, संजय शेंडे : अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्त्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसनं हा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला होता. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कृती यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अखेर आज सकाळी पोलिसांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रमाचे आयोजक निशांत जोध यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलिसांकडून देण्यात आली आहे. काँग्रेस आक्रमक दरम्यान संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.