मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर..' आघाडीच्या विजयी उमेदवाराचं धक्कादायक विधान

'मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर..' आघाडीच्या विजयी उमेदवाराचं धक्कादायक विधान

आघाडीच्या विजयी उमेदवाराचं धक्कादायक विधान

आघाडीच्या विजयी उमेदवाराचं धक्कादायक विधान

अमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत मतमोजणी करताना निवडणूक विभागावर भाजपने दबाव टाकल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवाराने केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बुलढाणा, 4 फेब्रुवारी : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्यात पार पडल्या. यात अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी भाजपचे रणजीत पाटील यांना पराभूत करत विजय संपादित केला. मात्र, या निवडणुकित मतमोजणी सुरू असताना भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा धक्कादायक आरोप विजयी उमेदवार धीरज लिंगाडे यांनी केला आहे.

भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर दिली : आमदार धीरज लिंगाडे

मतमोजणी करत असताना चक्क निवडणूक अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर देण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप धीरज लिंगाडे यांनी बुलढाणा येथील त्यांच्या स्वागत समारंभात करून एकच खळबळ माजवून दिली आहे. अमरावती मतदार संघातील मतमोजणीवेळी अटीतटीच्या सामन्यात 8 हजार बाद झालेल्या मतांची मोजणी करत असताना निवडणूक अधिकाऱ्यांवर भाजपने दबाव आणत खोक्यांची ऑफर दिली होती, असं विधान आमदार धीरज लिंगाडे यांनी केलं आहे.

वाचा - सत्यजीत तांबेंसाठी दादांकडून डॅमेज कंट्रोल! पण नाना अजित पवारांवरच बरसले!

आमदार धीरज लिंगाडे ठरले जायंट किलर

राज्यात गुरुवारी विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणी पार पडली. यातील अमरावती पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी तब्बल 30 तास चालली. या अटीतटीच्या लढतीत महाआघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार व माजी गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांचा पराभव केला. विधानपरिषद निकालात महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. त्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ व अमरावती पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. भाजपला केवळ कोकण शिक्षक मतदारसंघात विजय मिळवता आहे.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती पदवीधर मतदारसंघात विजय खेचून आणणारे धीरज लिंगाडे हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला आहे. धीरज लिंगाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, अमरावतीची जागा काँग्रेसकडे गेल्याने धीरज लिंगाडे यांनी ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून अमरावतीची तिकीट मिळवली. धीरज लिंगाडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते होते. बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, धीरज लिंगाडे मातोश्रीशी एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंसोबत राहिले. लिंगाडे आधीपासून मतदारसंघात निवडणुकीची मोर्चेबांधणी करत होता. यासाठी त्यांनी भेटीगाठी वाढवल्या होत्या. गेल्या दीड-दोन वर्षापासून ते झटत होते.

First published:

Tags: BJP, Vidhan parishad maharashtra