जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amaravati News : एटीएममधून पैसे चोरण्याची नवी शक्कल! पाहून पोलीसही झाले हैराण; 3 आरोपींना अटक

Amaravati News : एटीएममधून पैसे चोरण्याची नवी शक्कल! पाहून पोलीसही झाले हैराण; 3 आरोपींना अटक

एटीएममधून पैसे चोरण्याची नवी शक्कल!

एटीएममधून पैसे चोरण्याची नवी शक्कल!

Amaravati News : एटीएममधून पैसे चोरण्याची नवी शक्कल गुन्हेगारांनी काढली आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 4 जुलै : पैसे काढण्यासाठी तुम्ही जर एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अमरावतीत एटीएममधून पैसे चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आलं आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले हे रात्री पोलीस पेट्रोलिंग करत असताना तिघे संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एटीएममधून पैसे चोरण्याचे साहित्य आढळल्याने, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीची चौकशी केली असता लोखंडी पट्टीच्या सहायाने एटीएममधून पैसे चोरत असल्याचा प्रकार उघड झाला. काय आहे प्रकार? अमरावतीच्या उस्माना मस्जिद परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी एका लोखंडी पट्टीच्या साह्याने ग्राहकांचे पैसे चोरण्याचा प्रकार केला आहे. अगदी सहजरीत्या चोरटे एटीएम मधून पैसे काढू शकत होते. 20 ते 25 वर्ष वयोगटातील 3 आरोपींनी हा एटीएम मधून पैसे चोरण्याचा नवा प्रकार केला. अनेकदा बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्यास, त्यातून पैसे निघत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना संशयसुद्धा येत नाही. आपण केलेल्या ट्रांजेक्शनचे पैसे चोरटे पळवू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन तीन आरोपींनी डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांनी दिली आहे. वाचा - बॉयफ्रेंडला जायचे होते सौदीला, पण आधी तिला भेटायला गेला अन् घडलं हादरवणारं कांड एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्या गेल्या काही वर्षांपासून एटीएम सेंटरमधून पैसे लुटण्याचे वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत. यापूर्वी एटीएम क्लोन करुन त्याद्वारे पैसे लंपास केले जायचे. यासाठी ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन एटीएम कार्ड बदललं जातं. नंतर याच कार्डच्या मदतीने पैसे काढले जातात. त्यामुळे एटीएममध्ये कोणाचीही मदत घेताना काळजी घेण्याचं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. तर बऱ्याच केसेसमध्ये एटीएम कार्ड आत घालण्याच्या ठिकाणी स्कॅनर बसवला जातो. यामध्ये आपण कार्ड टाकल्यानंतर आपली सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते. याच माहितीद्वारे नंतर बनावट कार्ड तयार करुन पैसे लुटले जातात. अशा सर्व फ्रॉडपासून वाचण्यासाठी सावधान राहणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात