जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राणा दाम्पत्याच्या अमरावतीच्या पोलिसांवरच गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

राणा दाम्पत्याच्या अमरावतीच्या पोलिसांवरच गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

  कथित लव्ह जिहाद प्रकरणामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पीडित तरुणी आणि तरुणाने गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आज राणा दाम्पत्याने आपली भूमिका मांडली.

कथित लव्ह जिहाद प्रकरणामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पीडित तरुणी आणि तरुणाने गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आज राणा दाम्पत्याने आपली भूमिका मांडली.

कथित लव्ह जिहाद प्रकरणामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पीडित तरुणी आणि तरुणाने गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आज राणा दाम्पत्याने आपली भूमिका मांडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर : अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग या महिन्याला सात कोटी रुपयांची वसुली करतात आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देतात असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. कथित लव्ह जिहाद प्रकरणामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पीडित तरुणी आणि तरुणाने गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आज राणा दाम्पत्याने आपली भूमिका मांडली. अमरावतील मधील शाई फेक प्रकरणासह इतर प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे. शाई कुणी फेकली, याचा खुलासा होईल. पण  महाविकास आघाडी सरकारने अमरावतीच्या सीपी आरती सिंग यांना आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा एककलमी कार्यक्रम दिला होता. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी महिन्याला सात कोटी रुपयांची वसुली करायची आणि उद्धव ठाकरे यांना पाठवायची. याचे पुरावे ॲाडीओ क्लीप आमच्याकडे आहे, संवाद झाला याचं रेकॅार्डिगसह पुरावे सीआयडी यांना देणार आहोत, असा आरोपच रवी राणा यांनी केला. याबाबत सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. दोन दिवसांआधी संपूर्ण प्रकरण सीआयडीकडे सुपुर्द केलंय. याबाबतचे कागदपत्र पोलिसांकडून काढून घेतलं, असा आरोपही राणांनी केला. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी आमच्या एका प्राचार्यावर पोस्को सारखा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांवर शाईफे प्रकरणात मी अमरावतीत नसताना माझ्यावर ३०७, ३५३ अशे खोटे गुन्हे दाखल केले, असंही राणा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला तेव्हा आम्हाला दोन दिवस नजर कैद केलं होतं. अनेक कार्यकर्त्यांना तडीपारी लावली, कोल्हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी आरती सिंगच्या माध्यमातून वसूली पथक नेमली होतं, असंही राणा म्हणाले. अमरावतीत लव्ह जिहादचे प्रकरणं आहेत. आमच्या विरोधात निवेदन देणारे MIM चे तडीपार झालेले कार्यकर्ते आहेत. आमच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आरती सिंग लोकांना सांगत आहेत.  एका मुलीच्या आईला न्याय देण्यासाठी खा. नवनीत राणा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या, पण त्यांच्यावरच आरोप होत आहे, अशी टीकाही राणा यांनी केली. तर, आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, कारण पोलिसातील काही लोक वर्दीचा गैरवापर करत आहे. मी ज्यासाठी पोलीस स्टेशनला गेले ते काम झालं. मुलगी तिच्या आई वडिलांना मिळाली. आमच्यावर केस दाखल करणे, यातच आरती सिंग यांचा इन्ट्रेस्ट आहे. आम्ही याला घाबरत नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. तसंच, ‘मुलीला कुणी दिशाभूल करत असेल तर त्या मुलीला वाचवणे आमचं कर्तव्य आहे. ती पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी सेनेची कार्यकर्ता आहे त्यांना मी ओळखत नाही’ असंही राणा म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात