Home /News /maharashtra /

Amravati राडा: आरोपींची धरपकड सुरु, 23 आरोपींना अटक; भाजप नेत्यांना रोखलं

Amravati राडा: आरोपींची धरपकड सुरु, 23 आरोपींना अटक; भाजप नेत्यांना रोखलं

अचलपूर (Achalpur) येथे रात्री दोन गटात दगडफेक आणि हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना रात्रीच अचलपूर येथे दाखल झालेत.

    अमरावती, 18 एप्रिल: अचलपूर (Achalpur) येथे रात्री दोन गटात दगडफेक आणि हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना रात्रीच अचलपूर येथे दाखल झालेत. आतापर्यंत 23 आरोपींना (23 accused) अटक करण्यात आली असून आणखी 100 ते 150 आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकिशोर मीना यांनी दिली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही घटना घडलेली नाही. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. SRPF च्या तीन कंपन्या, अमरावती शिवाय अकोला येथील 100 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अचलपूर येथे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. शांतता राखण्याचे नवनीत राणा यांचे आवाहन यावर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी हिंदू असो वा मुस्लीम सर्वांनी आपल्या जिल्ह्यात, राज्यात शांतता राखावी असे आवाहन केलं आहे. तसंच पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी मात्र निर्दोष लोकांना त्रास देऊ नये अशी मागणी केलेली आहे. भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात चांदूरबाजार नाक्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी,भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 25 भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन आसेगाव पोलीस ठाण्यात नेलं आहे. नेमकी घटना काय? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आलं. नात्याला काळीमा..! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या नरकयातना, नराधम फरार कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अचलपूर शहरामध्ये शांतता आहे. शहरात केवळ रस्त्यावर पोलीस असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच आवाहन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नये म्हणून सोशल माध्यमांवर बंदी टाकण्यात आलेली आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी केलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Amravati, Violence

    पुढील बातम्या