Home /News /maharashtra /

नात्याला काळीमा..! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या नरकयातना, नराधम फरार

नात्याला काळीमा..! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या नरकयातना, नराधम फरार

परळीतून (Parli) अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नात्यातील (relationship) निर्दयी सख्या मामानंच हे दुष्कृत्य केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

    बीड, 18 एप्रिल: परळीतून (Parli) अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धारावती तांडा परिसरात वीटभट्टीवर काम करणाऱ्या आई सोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. नात्यातील (relationship) निर्दयी सख्या मामानंच हे दुष्कृत्य केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अत्याचारास विरोध करणाऱ्या पीडितेच्या आईला देखील मामाने मारहाण केल्याची माहिती समोर येतेय. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल झाला आहे. तर नराधम मामा सध्या फरार आहे. परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही महिला आपल्या भावाकडे राहते. या महिलेला पतीनं सोडून दिलं आहे. ही महिला वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर नात्यातील सख्या निर्दयी मामानेच असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत गलिच्छ दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राज्यातल्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय नराधम मामा केवळ अल्पवयीन भाचीवर अत्याचार करून थांबला नाही तर तो अत्याचारास विरोध करणार्‍या आपल्या बहिणीला ही मारहाण करत होता. या प्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं ९९/२०२२ कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादवी, कलम ३, ४,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Beed, Rape, Rape accussed

    पुढील बातम्या