राज्य सरकारनं जाहीर केली नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं होणार सुरू पण...

राज्य सरकारनं जाहीर केली नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं होणार सुरू पण...

महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या लाँकडाऊन मधील नवीन नियमावली राज्यसरकारने केली जाहीर. राज्यात आता तीन झोन केले आहेत. यात 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नाँन रेड झोन असतील. ही नियमावली मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान रात्री 7 ते सकाळी 7 दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली

-सरकारच्या वतीनं इ-कॉमर्स (ऑनलाईन) सामनासाठी आजपासून परवानगी दिली आहे.

-रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये मैदानं, स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात येतील. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

- रेड झोनमध्ये दुकानं, मॉल्स, कारखाने खुली करण्याची परवानगी. केवळ देखभालीसाठी खुली करण्यात यावी. मात्र मॉल्समध्ये सामानांची विक्री केली जाणार नाही. ही दुकानं सकाळी 9 ते 5 पर्यंत खुली राहतील.

-रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा किंवा कॅबना परवानगी नाही. बस या फक्त रेड झोन नसलेल्या परिसरात चालवल्या जातील.

-रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रिक्षांसाठी चालक वगळता केवळ 2 लोकांना बसण्याची परवानगी असेल. तर, चारचाकीसाठी चालक वगळता 2 लोकांना प्रवास करण्याची परवानगी असेल.

या सेवांवरील सर्व झोनमधील बंदी असणार कायम

-राज्य अंर्तगत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीस बंदी कायम.

-मेट्रोवरील बंदी कायम

-शाळा, कॉलेज, महाविद्यालयं बंदच राहतील. परंतु ऑनलाइन वर्ग आणि कोर्स सुरू ठेवू शकतात.

- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. केवळ पोलीस आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना सेवा देणाऱ्या कॅंटिन सेवा सुरू राहतील. बस, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरील कॅटिननं परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलिव्हरी होईल.

- सिनेमागृह, मॉल्स, जिम, स्वीमिंग पूल, उद्यानं, हॉल्स बंदच राहतील.

-कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यावरील बंदी कायम

-राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद राहतील.

-सलून, पार्लर यांना  परवानगी नाहीच

या सेवांवर काही प्रमाणात सूट

-रेड झोनमध्ये दारूच्या दुकानांमधून केवळ होम डिलिव्हरी केली जाणार आहे. बाकी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये दुकानं खुली असतील. तर कन्टेन्मेंट झोनमध्ये मात्र दुकानांवर बंदी कायम असेल.

-कन्टेन्मेंट वगळता इतर सर्व भागातील दवाखाने सुरू करण्याची परवानगी.

-सर्व भागांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली जाणार आहे.

-कन्टेन्मेंट वगळता इतर सर्व ठिकाणच्या बॅंक, कुरिअर सेवा सुरू राहणार आहेत.

-ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मैदानं खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहेत. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

-कन्टेन्मेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणी सामनाची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

First published: May 19, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading