**अहमदनगर, 27 एप्रिल: ‘**मी कारवाईला घाबरत नाही. मी जनतेसाठी काम करतोय, जे इंजेक्शन आणले होते ते चार दिवसांपूर्वीच वाटप झााले होते, आता रेमडेसीवीर इंजेक्शन (remdesivir injection) कुठे आहे? असा उलट सवाल भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी उपस्थितीत केला आहे. राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना भाजपचे खासदार सुजख विखे पाटील यांनी इंजेक्शनचा साठा आणून परस्पर वाटप केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानेही या प्रकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना आपली भूमिका मांडली आहे.
‘मी जो काही व्हिडीओ काढला होता, तो सर्वांनी पाहिला आहे. मी त्या व्हिडीओमध्ये कोणतीही संख्या सांगितली नाही. त्यामुळे 10 हजारांचा आकडा कुणी काढला हे मला माहिती नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने या प्रकाराबद्दल मला विचारणा करावी, मी त्यांना उत्तर देण्यास तयार आहे, पण जिल्ह्याबाहेरील लोकांना उत्तर देण्यास मी बंधनकारक नाही. जे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आले आहे, अशा लोकप्रतिनिधींनी जर इंजेक्शन नव्हते हा खोटेपणा होता, असं विचारावे, त्यांना संपर्क साधून योग्य ते उत्तर देईल, पण कुणी नियुक्त केलेल्या लोकप्रतिनिधींनी याबद्दल विचारू नये, बाहेरील कुणी टीका करू नये, असंही विखे म्हणाले. ‘कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आम्ही नगरमध्ये काम करत आहोत. गेली 50 वर्ष झाली आहे, नगरच्या लोकांना याबद्दल सगळं काही माहिती आहे. त्यामुळे मी बाहेरच्या लोकांना उत्तर देणार नाही’, असंही विखे पाटील म्हणाले. तुम्ही सॅनिटायझरचा योग्य पद्धतीने वापर करता आहात का? जाणून घ्या योग्य पद्धत न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, जे इंजेक्शन वाटप केले आहे, ते आपण पैशाने जमा करणार आहात का? असा सवाल विचारला असता सुजय विखे म्हणाले की, ‘इंजेक्शन आहे तरी कुठे? जे इंजेक्शन आले होते, ते आधीच वाटले आहे. चार दिवसांआधीच वाटप केले होते आणि नंतर मी व्हिडीओ तयार केला होता. ज्यांना कुणाला पुरावा हवा असेल त्याबद्दल कागद पत्र आहे. मी कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. माझ्यामुळे ज्या रुग्णाचे जीव वाचले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता रिकामे डबे उरलेले आहे, त्यांना घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकता.’

)







