जालना, 12 जुलै: महाराष्ट्र राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र राज्यावरील (Maharashtra State) कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात 8 ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सरकारमध्ये शाळा (School Reopen) सुरु कराव्यात की नाही यावर चर्चा सुरु आहे. मात्र यावर राजेश टोपे अनुकूल नसल्याचं समजतंय. सध्या तरी राज्यात शाळा सुरु करु नयेत, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राजेश टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे कॉलेज सुरु करण्यास काही हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाच्या प्रार्दुभावाचा धोका अधिक असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे कॉलेज सुरु करण्यास हरकत नसल्याचंही ते म्हणालेत. हेही वाचा- VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यामुळे सध्या राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी काही पालकांनी केली. त्यानंतर राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरु केलं. या सर्वेक्षणात अधिकाधिक पालकांनी शाळा सुरू कराव्यात असं मत मांडलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत एक तर निर्बंध कडक ठेवले पाहिजेत किंवा त्यात सूटच दिली पाहिजे, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.