Home /News /maharashtra /

आधी सोशल मीडियात मैत्री मग अश्लील VIDEO काढून करतात ब्लॅकमेल, असं ओढलं जातंय तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

आधी सोशल मीडियात मैत्री मग अश्लील VIDEO काढून करतात ब्लॅकमेल, असं ओढलं जातंय तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

सुंदर मुलीचा फोटो ठेऊन फेसबुक वर तरुणांसोबत मैत्री करायची.नंतर त्याचा व्हाट्सऍप न घेऊन त्यावर अश्लील व्हिडीओ कॉल करून त्याला त्या जाळ्यात अडकवायचे व नंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळायचे...असा प्रकार वाशिम जिल्ह्यातील अनेक तरुणांसोबत घडला आहे.

पुढे वाचा ...
वाशिम, 18 डिसेंबर : सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे संवाद साधत अश्लील व्हिडीओ कॉल (video call) करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच अश्लील व्हिडीओच्या आधारे खंडणीची मागणी करण्याच्या अनेक घटना दरदिवशी घडत असून असे अनेक प्रकार वाशिम जिल्ह्यात (Washim district) समोर येत आहेत. सेक्सटॉर्शनचे वाढते जाळे (sextortion racket) आणि पैशासाठी चाललेल्या या खेळात उच्चशिक्षित तरुण टार्गेट होत होत असून तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता असे प्रकार टाळण्याची गरज आहे. वाशिम जिल्ह्यातील एका तरुणाची फेसबूकवर मैत्री करून ओळख झालेल्या एका तरुणीने उच्चशिक्षित तरुणाला अश्लील व्हिडीओ कॉल करून कॉलवर त्याच अवस्थेत येण्यास सांगितले. वाचा : गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं; भरदिवसा तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद पुढे हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली तरुणाला हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात घडला आहे. या घटनेत बदनामीच्या भीतीने या उच्चशिक्षित तरुणाने पैसेही दिले. तरीही त्या टोळीने त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली. त्यामुळं हा उच्चशिक्षित तरुण खचून गेला. नैराश्य आलेल्या या तरुणाला कोणतीही नोकरी मिळणार नाही या चिंतेने ग्रासल्यानं त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ही उचलले होते. मात्र तेव्हा त्याच्या काही मित्र, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्या उच्चशिक्षित मुलाचं समुपदेशन करून त्याला या संकटाच्या बाहेर काढले आहे. वाचा : क्षुल्लक कारणानं विद्यार्थ्याला आला राग, शिक्षकालाच मारली कानशिलात; हे आहे कारण स्वतःची फसवणूक झाल्यानंतर त्या उच्चशिक्षित तरुणाने सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्व तरुणांना आवाहन केलंय की, व्हाट्सअप वर येणाऱ्या व्हिडीओ-ऑडिओ कॉल किंवा फेसबूक वरील कोणत्या ही रिक्वेस्ट ला बळी पडू नये. या तरुणाच्या आवाहनाला जर जिल्ह्यातील इतर सर्वच तरुणांनी साद दिली तर त्यांची सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक टळेल. तरुणांना रिक्वेस्ट पाठवून त्यांना अलगद फसव्या कॉलमध्ये अडकवून पैसे उकळण्याच्या या टोळीच्या मुसक्या आवळणे आवश्यक झाले आहे. जर असे प्रकार सुरूच राहले तर काहींच्या जीवनात अंधकार पसरण्याची शक्यता वाटते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Washim

पुढील बातम्या