मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola : चिंताजनक! अकोल्यात 16 लाखांचा दंड वसूल, तरीही सर्सासपणे होतोय प्लास्टिकचा वापर

Akola : चिंताजनक! अकोल्यात 16 लाखांचा दंड वसूल, तरीही सर्सासपणे होतोय प्लास्टिकचा वापर

X
जिल्ह्यासह

जिल्ह्यासह ग्रामीण भागात सुद्धा प्लास्टिक पिशव्यांची बंदी आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना पाहायला मिळत आहे. शहतील बाजार, किराणा दुकान, भाजीपाला, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्याकडे जास्तीत जास्त या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. यामुळं पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.

जिल्ह्यासह ग्रामीण भागात सुद्धा प्लास्टिक पिशव्यांची बंदी आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना पाहायला मिळत आहे. शहतील बाजार, किराणा दुकान, भाजीपाला, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्याकडे जास्तीत जास्त या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. यामुळं पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.

पुढे वाचा ...

    अकोला, 18 जून : पाणी प्रदूषण (Water pollution) व इतर प्रदूषणास प्लास्टिक कचरा सर्वात घातक आहे. यामुळं प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर सरकारनं बंदी घातली आहे. प्लास्टिक बंदीच्या (Plastic ban in maharashtra) नियमाला सोयीस्कररीत्या बगल देऊन दुकानदार आणि नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरातील व्यापारी, छोटे व्यवसायिक, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, हाॅलेट व्यावसायिक ग्राहकांना माल देताना प्लास्टिक पिशव्यांचा (Plastic bag) वापर करत आहेत. प्रशासनाकडून प्लास्टिक वापराबाबत कारवाई होत आहे तरी देखील प्लास्टिक पिशव्यांचा सर्सास वापर होतोय. याबाबतचा हा रिपोर्ट पाहूया.

    वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT

    जिल्ह्यासह ग्रामीण भागात सुद्धा प्लास्टिक पिशव्यांची बंदी आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना पाहायला मिळत आहे. शहतील बाजार, किराणा दुकान, भाजीपाला, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्याकडे जास्तीत जास्त या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. यामुळं पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. मात्र, याबाबीकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. प्रशानाच्या जुजबी दंडात्मक कारवाईची व्यापाऱ्यांना भिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण कारवाईनंतरही प्लास्टिकचा वापर बाजारात होत आहे. 

    प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यात वाढ

    पावसाळा लागताच प्लास्टिक पिशव्यामुळे नाल्या तुंबतात. नाल्यातील पाणी रस्यावर आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, शहरात दररोज जमा होणाऱ्या कोरड्या कचऱ्यापैकी प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील व्यापारी, छोटे व्यवसायिक, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, मेडिकल दुकाने ग्राहकांना माल देताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. 

    प्लास्टिक पिशव्यातील अन्न शरीरासाठी घातक

    यात खाद्यपदार्थांच्या पिशव्यांसह हँड बॅगचेही प्रमाण अधिक आहे. बंदी घातल्यानंतर काही दिवस व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळून कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर वाढला होता, परंतु कोरोना लाॅकडाऊनंतर पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. प्लास्टिक पिशव्या स्वस्त आणि वापरुन फेकता येत असल्याने याचा अधिक वापर होतो. पण यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांकडे दुर्लक्ष केलं जाते. खाद्यपदार्थ सुद्धा प्लास्टिक पिशव्यांमध्येच दिली जातात. प्लास्टिक पिशव्यातील अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पर्यापरण आणि शरीराच्या सुरक्षेसाठी प्लास्टिकचा वापर टाकणे गरज बनले आहे,

    हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?

    16 लाखांचा दंड वसूल 

    प्लास्टिक बंदी आणि निर्मूलन संदर्भातील अधिनियम आणि त्याअनुषंगाने स्थानिय पातळीवरचे नियोजन क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे असते. 33 आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून प्लास्टिक वापराबाबत कारवाई केली जाते. शहरातील अविघटनशील प्लास्टिक जप्तीची मोहीम, दंडाची मोहीम आखण्यात येते. यात पहिल्या वेळी 5 हजार रुपये तर दुसऱ्या वेळी 25 हजारांपर्यंतचा दंड आकारण्यात येतो. 2021-22 या वर्षात आतापर्यंत 16 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लाॅस्टिक बंदीबाबत शहरातील शाळा, महाविद्यालयात प्रबोधन करण्यात येत आहे, पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा निघाला. त्याचे देखील विघटन महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये करण्यात येत आहे. 

    First published:
    top videos

      Tags: Akola News, Environment, Plastic