मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola : दोन वर्षात दोनदा भूकंपाचे झटके, नैसर्गिक आपत्तीवेळी कशी घ्याल काळजी? Special report

Akola : दोन वर्षात दोनदा भूकंपाचे झटके, नैसर्गिक आपत्तीवेळी कशी घ्याल काळजी? Special report

X
अकोला

अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी जवळ 11 जून रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सूमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर या भूकंपाचे केंद्र होते.

अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी जवळ 11 जून रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सूमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर या भूकंपाचे केंद्र होते.

  अकोला, 29  जून : मानवाने प्रगती करताना निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ सुरू केली. मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये गुंतागुंत अधिकच वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि प्रगती करताना, निसर्गाच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यामुळे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण होत आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसात अशीच एक निसर्गनिर्मित दुर्घटना (Natural disasters) घडली. जिल्ह्यातील बार्शीटाकळीजवळ भूकंपाचे (Earthquakes in akola) सौम्य धक्के बसले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे समोर आले नाही. अशा नैसर्गिक आपत्तीवेळी घ्यायची काळजी आणि आपत्तीच्या कारणाबाबतचा विशेष रिपोर्ट पाहूया. 

  अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी जवळ 11 जून रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सूमारास भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर या भूकंपाचे केंद्र होते. तर रिश्टर स्केलवर 3.50 इतकी भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तर अकोल्यात गेल्यावर्षी देखील भूकंपाची घटना घडली होती. अकोला शहरापासून 19 किमी लांब असलेल्या बाळापूर शहरात भूकंपाचे हादरे बसले होते. त्या भूकंपाचे तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी होती. त्यावेळीदेखील कोणतीही हानी झाली नव्हती. संबंधित घटना ही गेल्यावर्षी 17 एप्रिलला घडली होती. त्यावेळी खिडकी आणि घराच्या दरवाजांचा अचानक आवाज सुरु झाला झाला होता. तसेच घरामध्ये गडगड असा आवाज ऐकू आला होता. पण सुदैवाने या भूकंपाची देखील तीव्रता कमी होती.

  हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?

  दोन वर्षात 2 वेळा भूकंपाचे धक्के

  भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. एखाद्या भागात भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेचे नुकसान होते. भूकंपांमुळे मनुष्य आणि प्राणी यांचा मृत्यू, सार्वजनिक आरोग्यावर परिणाम, शारीरिक नुकसान, वाहतूक नेटवर्कमध्ये व्यत्यय, वीज आणि संप्रेषण सेवेचा व्यत्यय अशा प्रकारचे नुकसान होते. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षामध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जमिनीत भुगर्भात ज्या हालचाली होतात त्या दृष्टिकोनातून काळजी घेणे गरजेचे आहे. भुगर्भातील हालचाली आढळल्या तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपण सुरक्षित ठिकाणी जाणे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असते. कारण हे भूकंपाचे धक्के असू शकतात. अशा स्थितीत घरामध्ये असाल तर शक्यतो बाहेर पडणं योग्यच किंव्हा, घरातील एखाद्या मजबूत जागेचा, वस्तूचा आडोसा घेणे आवश्यक आहे. स्वत:सह कुटुंबाची सुद्धा अशावेळी काळजी घेतली पाहिजे जेणेकरुन अशा प्रसंगी कुठलीही जीवितहानी होणार नाही. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देखील याबाबत जनगागृती करुन माहिती दिली जाते, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. 

  जिल्ह्यातील बार्शीटाकळीच्या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची पुर्वकल्पना मिळत नाही. अशा धक्क्याने नागरिकांची तारांबळ उडते भितीदायक वातावरण तयार होते. जसे हवामान खातं नागरिकांना पावसाची पूर्व अंदाज देतो त्याप्रकारचे भुकंपाची देखील माहिती देणारी काही यंत्रना असावी, कार्यालय असावं, असे स्थानिक नागरिक विठ्ठल वाघ आणि संजय वाडकर यांनी सांगितले.

  आपत्तीवेळी आपण कोणाशी संपर्क कराल?

  नैसर्गिक आपत्तीची चाहूल लागता याबाबत प्रशासनाला माहिती पोहोचवणे आवश्यक असते जेणेकरुन तुम्हाला प्रशासनन तातडीने मदन पोहोचवू शकते. जर तुम्हाला आपत्तीची चाहूल लागली तर अशा वेळेस वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती शाखा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष विभागाशी आपण संपर्क साधू शकता. किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या दूरध्वनी क्रमांकावर (0724-2424444) संपर्क साधू शकता.

  Office Of District Collector, Akola

  गुगल मॅपवरून साभार

  वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT

  भूकंप कशामुळे होतो?

  भूकंप नैसर्गिक आणि मानवी दोन्ही कारणांमुळे उद्भवू शकतो. ज्वालामुखीच्या कृती, जमीन संतुलनाशी संबंधित समायोजन, प्लेट्सची हालचाल, अंतर्गत वायूंचे प्रमाण वाढणे या नैसर्गिक कारणांमुळे भूकंप होऊ शकतो. तसचे मानवनिर्मित अणू चाचण्या, धरणे व प्रचंड जलाशयांचे बांधकाम, अस्थिर प्रदेशात रस्ते बांधणे अशी कारणे देखील भूकंपासाठी कारणीभूत आहेत.

  भूकंपांपासून संरक्षण कसे करावे? 

  जर आपण योजना आखली आणि कार्य केले तर कोणतेही संकट टाळता येईल. त्याच प्रकारे, भूकंपा दरम्यान आणि नंतर सुरक्षा आणि खबरदारी घेतली जाऊ शकते. आपल्याला हादरा जाणवताच, घराच्या बाहेर, कार्यालयाच्या किंवा बंद इमारतीच्या बाहेर, रस्त्यावर किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे आवश्यक आहे. घरात गॅस सिलेंडर आणि विजेचा मुख्य स्विच बंद करणे आवश्यक आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर वाहन चालवू नका, किंवा वाहनातून प्रवास करू नका. सुरक्षित आणि संरक्षित जागेवर कुठेतरी उभे राहुन स्वत:चे संरक्षण करा. कोणत्याही खोल जागेजवळ, कमकुवत आणि जुन्या घराजवळ उभे राहू नका यामुळे तुम्हाला मोठा धोका असू शकतो.

  First published:

  Tags: Akola News, Earthquake