मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : शेकडो वर्षांपासून विसर्जनच नाही, जाणून घ्या बाराभाई गणपतीचा रंजक इतिहास

VIDEO : शेकडो वर्षांपासून विसर्जनच नाही, जाणून घ्या बाराभाई गणपतीचा रंजक इतिहास

पेशवेकाळात बारा जातीच्या बारा लोकांनी एकत्र येत या गणपतीची स्थापना केली होती. विसर्जन मिरवणुकीत गणपतीचे स्थान सर्वांसमोर असतं.

अकोला : लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यामागे सामाजिक तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना दडलेला आहे. गणेश उत्सवातून टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा राजमार्ग शोधला होता. अठरापगड जातीच्या लोकसहभागाची त्याला सोनेरी किनार होती. अकोल्याचा मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीचा (Barabhai Ganapati) इतिहास नेमके याचीच साक्ष देणारा आहे. पेशवेकाळात बारा जातीच्या बारा लोकांनी एकत्र येत या गणपतीची स्थापना केली होती. त्यावरूनच गणपती बाराभाईंचा गणपती म्हणून ओळख मिळाली आहे. (Ganeshotsav 2022) दीडशे वर्षापूर्वीची मूर्ती लोकमान्य टिळकांनी पुणे इथे 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र अकोल्यात हा विचार फार पूर्वीच रुजला होता. अकोल्यातील भगवाननाथ इंगळे यांनी या मंडळाची स्थापना केली होती. मूर्ती घडविण्यापासून तर विसर्जनापर्यंतच्या सर्व कामांमध्ये सर्वच जाती-धर्मातील लोकांना सामावून घेण्यात आलं होतं. स्थापनेपासून या गणेश मूर्तीचं विसर्जन केले जात नाही. उत्सव काळातच भक्तांच्या दर्शनासाठी मूर्ती सर्वांसमोर आणली जाते. काळ्या मातीपासून बनविलेली ही मूर्ती स्थापनेपासूनची असून मूर्तीला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत.  विसर्जन मिरवणुकीत सर्वांसमोर बाराभाई गणपती हा अकोल्यातील मानाचा गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत त्याचं स्थान सर्वांसमोर असतं. अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातूनच भाविक येथे दर्शनासाठी येतात. माहेरवाशीण मुलीही गणेशोत्सवात आवर्जून बाराभाईच्या दर्शनासाठी येत असल्याचे बाराभाई गणपतीच्या चौथा पिढीतील कार्यकर्ता राहुल इंगळे यांनी सांगितले.  ढोल वाजविण्याचा मान कुंभार समाजाला नावाप्रमाणेच या गणपतीने समाजातील अठरा पगड जातींना एकत्रित आणलं आहे. मूर्ती घडविण्याचा मान ठाकूर समाजाच्या मूर्तिकाराला आहे, मूर्तीच्या वर्षभर देखभालीचा मान नाथ समाजाला, मिरवणुकीत ढोल वाजविण्याचा मान कुंभार समाजाला, तर पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला आजही कायम आहे.  वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती अकोला शहरातील मानाचा मानल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीचा उत्सव कित्येक वर्षापासून सुरू आहे. बाराभाईचा गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मानाचा म्हणून व ऐतिहासिक म्हणूनही प्रथम क्रमांकावर असतो. या गणपतीची पूजाअर्चा केल्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. हा वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती आहे. इंगळे कुटुंबाला उत्सवाचे अधिकार नाथ इंगळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडे येथील गणपती उत्सवाचे सारे अधिकार आहेत. गणपतीची पालखी वाहणाऱ्या भोयांची तिसरी पिढी गणेशाच्या सेवेत आहे. पालखीचे ध्वजवाहकही परंपरेने तिसऱ्या पिढीचेच आहेत. हा गणपती मनोकामना पूर्ण करतो, नवसाला पावतो, अशी ठाम श्रद्धा आहे. ढोलाचे भजन व दिंड्या हाच या गणपतीचा साज आहे. आजही या गणपतीसमोर इतर वाद्ये वाजत नाहीत.
First published:

Tags: Akola, Akola News, गणपती, गणपती बाप्पा, गणपती विसर्जन मिरवणूक

पुढील बातम्या