अकोला, 15 जून : महागाईच्या काळात माफक दरात (reasonable rates) जेवण कुठं मिळणार? पण जरा थांबा महागाई गगनाला भिडत असताना अकोल्यातील एका गाड्यावर चक्क 20 रुपयात पोटभर चटकदार पुरी भाजीची (Puri Bhaji) मेजवानी दिली जाते. छोट्या गाड्यावर मिळणाऱ्या या पुरी भाजीचा दर तर माफक आहेच पण चव देखील न्यारी आहे. जवळपास 25 वर्षापुर्वी सुरू केलेल्या अकोल्यातील चटकदार पुरी भाजीबद्दलचा हा खास रिपोर्ट तुमच्यासाठी.
वाचा- Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!
अकोल्यातील नेहरू पार्क चौकातील रोडच्या कडेला एका छोट्याशा गाडीवर आशिष रामभाऊ बनकर (संपर्क क्रमांक 8805471268) पुरी भाजीचा गाडा चालवतात. जेमतेम शिक्षण झालेल्या आशिष यांच्या हाताला एखाद्या मोठ्या हाॅटेलला लाजवेल अशी चटकदार चव आहे. पुरीभाजीच्या एका प्लेटमध्ये सहा नग पुऱ्या आणि एक प्लेट सोयाबीन वड्याची भाजी दिली जाते. माफक दर आणि स्वादिष्ट चवीमुळे या गाडीवर रोज हजारो ग्राहक येतात. पार्सल सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहक येथून पार्सल देखील घेवून जातात.
पुरी भाजी बनवण्यासाठी आशिष यांना रोज 75 किलो पीठ आणि 50 किलो तांदूळ लागतो. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत येथील गाड्यावर पुरी भाजी मिळते. “महागाईच्या काळात केवळ 20 रुपयात पोटभर पुरी भाजी खावून पोट भरतं. सोबतच इथं मनातून सर्वीस दिली जाते. एखाद्या संस्थानमध्ये जशी सेवा मिळते तसेच आमच्या गरीबांच हे संस्थान आहे आम्ही इथं नेहमी पुरी भाजी खायला येतो,” अशी प्रतिक्रीया येथील ग्राहकांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.