Home /News /maharashtra /

Akola Flood : अकोला जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर; पूर्णा नदीला पूर, 100 गावांचा संपर्क तुटला, VIDEO

Akola Flood : अकोला जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर; पूर्णा नदीला पूर, 100 गावांचा संपर्क तुटला, VIDEO

पूर्णा

पूर्णा नदीच्या पुलावरून रात्री पासूनच वाहतूक बंद

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. पुलावरील पाण्यामुळे जवळपास 100 गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मध्यप्रदेशला जोडणारा देखील हा एकमेव मार्ग आहे.

    अकोला, 19 जुलै : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अकोला जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील पावसाचं पाणी दर्यापूर मार्गे अकोला जिल्ह्यातील मैसांग आणि गांधीग्राम येथील पूर्णा नदीला  येऊन मिळते. या पाण्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील पुलावरून पाणी जात असल्याने अकोट-अकोला आणि अकोला-अकोट मार्ग बंद झाला आहे. नदी पुलावरून सध्या तब्बल 10 ते 12 फूट पाणी वाहत आहे. पुरामुळे जवळपास 100 गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.  पावसामुळे अकोलावरून अकोटकडे जाणाऱ्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून रात्री पासूनच वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. पूर्णा नदीच्या पुलावरून 10 ते 12 फूट पाणी वाहत आहे. पाण्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. या मार्गावरून रोज हजारो वाहने धावतात त्याचबरोबर अनेक नागरिक अकोला ते अकोट आणि अकोट ते अकोला या मार्गांवर नोकरीसाठी ये जा करत असतात. पुलावर पाणी आल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने रस्त्याअभावी आणि पूल ओलांडता येत नसल्याने अनेकांची मह्त्त्वाची कामे खोळंबली आहेत.  अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. पुलावरील पाण्यामुळे जवळपास 100 गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मध्यप्रदेशला जोडणारा देखील हा एकमेव मार्ग आहे. पुराच्या हे पाणी परिसरातील शेतात जात असून शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे. पुलावरील पाणीपातळी पाहता अकोला ते अकोट मार्ग काल सायंकाळ पासून बंद ठेवण्यात आला असून नागरिकांनी सध्या येथून प्रवास करणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    First published:

    Tags: Akola, Akola News, Rain, Rain flood, Rainfall, Weather update, Weather warnings

    पुढील बातम्या