Home /News /maharashtra /

Akola : अकोल्यात मिळणाऱ्या झणझणीत मिरचीची भाजी अन् भाकरीबद्दल माहितीये का?, पाहा VIDEO

Akola : अकोल्यात मिळणाऱ्या झणझणीत मिरचीची भाजी अन् भाकरीबद्दल माहितीये का?, पाहा VIDEO

title=

घराबाहेर जेवण असो की नाष्टा अनेकांचा प्राधान्यक्रम हा चवदार पदार्थांचा असतो. वडापाव, पोहे, समोसा, कचोरी, भजे अशा पदार्थावर लोकं विशेष: ताव मारतात. पण अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये या सर्व नास्ता बरोबर खमंग आणि जिभेची चव पुरवणारी मिरचीची भाजी आणि ज्वारीची भाकरी अशी भन्नाट डिश मिळते.

पुढे वाचा ...
    अकोला, 29 जून : बाहेरचं जेवणं किंवा नाष्टा म्हटलं की डोळ्यासमोर तेलकट, मसालेदार चमचमीत पदार्थ येतात. पण असे पदार्थ शरीराला देखील फायद्याचे नसल्याचे डाॅक्टर सांगतात. त्यामुळे अनेक हाॅटेलात देखील कमी तेलकट पदार्थाच्या डिश मिळणे सुरू झाल्या आहेत. यातील काही डिशचे नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. त्यापैकीच एक डिश म्हणजे झणझणीत मिरचीची भाजी आणि  भाकरी. अकोल्यातील एका कॅन्टीनमध्ये ही डिश मिळते. ही भन्नाट डिश खाण्यासाठी लोकं गर्दी करतात.  घराबाहेर जेवण असो की नाष्टा अनेकांचा प्राधान्यक्रम हा चवदार पदार्थांचा असतो. वडापाव, पोहे, समोसा, कचोरी, भजे अशा पदार्थावर लोकं विशेष: ताव मारतात. पण अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये या सर्व नास्ता बरोबर खमंग आणि जिभेची चव पुरवणारी मिरचीची भाजी आणि ज्वारीची भाकरी अशी भन्नाट डिश मिळते. येथील मिरचीची भाजी आणि भाकरी खायला आवर्जून नागरिक येतात. वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT अकोला जिल्ह्यातील शासकीय कुठलेही काम असो प्रत्येकाला जिल्हाधिकारी कार्यालयात यावचं लागते. शासकीय काम म्हंटल तर वेळ लागणार. आणि वेळ लागला म्हणजे पोटाला आधार म्हणून काही तरी खावं लागणारच. मग तेलकट पदार्थाला पर्यायी आणि स्वादिष्ट चवदार मिरचीची भाजी आणि भाकरी येथील कॅन्टीनमध्ये मिळते. 60 रुपयात अगदी पोटभर दिली जाणारी ही डिश खाऊन लोक तृप्त होतात. ग्रामीण भागातील नागरिक, शहरातील नागरिक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी या कॅन्टीनवर मिरचीची भाजी आणि भाकरीचा स्वाद घेतात. मिरचीची भाजी रेसिपी  साहित्य – एक वाटी तूरडाळ, एक वाटी तुकडे होतील एवढ्या मिरच्या (मिरच्या अख्या ठेवायच्या आहेत) , एक जुडी आंबट चुका, चुका मिळाला नाही तर 3 हिरवे टोमॅटो, 2 मध्यम आकाराची काटेरी वांगी, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं यांची पेस्ट, एक टेबलस्पून सुकं खोबरं, 2 कांदे बारीक चिरून, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, 2 टीस्पून काळा मसाला, प्रत्येकी एक टीस्पून धणे-जिरे पूड, एक टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद, आणि मीठ यातून ही डिश तयार होते. या डिश सोबत भाकरी, कच्चा कांदा-लिंबू घ्यायचा. भाजी खाताना लिंबू पिळून खा. त्यात भाकरी कुस्करून तर जी काय चव लागते ती केवळ स्वर्गसुखच! म्हणावं लागेल. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? “मिरचीची भाजी आणि भाकरी प्रयोग म्हणून अकोल्यात सुरू” आमचं कॅन्टीन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे. मिरचीची भाजी आणि भाकरी हे बुलढाणा जिल्ह्यातलं फेमस जेवण आहे. प्रयोग म्हणून अकोल्यात सुरू केलं. अकोल्यात देखील लोकांचा याचा मोठा प्रतिसाद मिळत असून लोक आवडीने मिरची भाजी आणि भाकरी खात आहेत. येथील चव पाहता अनेकजण दररोज इथून पार्सल देखील घेवून जात असल्याची माहिती, कॅन्टीन मालक जितेंद्र देशमुख यांनी दिली. कॅन्टीन पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मिळत असलेल्या या मिरची भाकरीची चव तुम्हाला देखील चाखायची असेल तर पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. संपर्क क्रमांक 9284242609 / 9850323486 “नेमकं मिरचीची भाजी म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडायचा.” मिरचीची भाजी आणि ज्वारीची भाकर हा प्रकार आम्हाला या आधी माहिती नव्हता. नेमकं मिरचीची भाजी म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडायचा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नेहमी कामानिमित्त यायचं. एकदा या कॅन्टीनमध्ये येऊन मिरचीची भाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला. तेव्हा कळलं की, मिरचीची भाजी नेमकं काय असते. पण खरच या भाजी भाकरीची चव अप्रतिम लागते. जिभेची चव पुरवणारी ही भाजी म्हटलं तरी चालेल, असे येथील ग्राहकांनी सांगितले.
    First published:

    Tags: Akola News, Tasty food

    पुढील बातम्या