Home /News /maharashtra /

Akola : मुलींसाठी दहावीनंतर आयटीआयमध्ये करिअर संधी, अकोल्यात आयटीआय प्रशिक्षणास प्रवेश प्रक्रिया सुरू

Akola : मुलींसाठी दहावीनंतर आयटीआयमध्ये करिअर संधी, अकोल्यात आयटीआय प्रशिक्षणास प्रवेश प्रक्रिया सुरू

title=

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोर्स पूर्ण झाल्यावर शिकाऊ उमेदवार योजनेमध्ये शिकाऊ उमेदवारी मिळते किंवा खाजगी तसेच शासकीय आस्थापनेवर नोकरीची सुद्धा संधी असून स्वयंरोजगार सुद्धा स्थापन करता येतो. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू इथं होतात. याद्वारे आयटीयातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध होत आहेत.

पुढे वाचा ...
  अकोला, 1 जूलै : महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2022) नुकताच जाहीर झाला आहे. दहावीनंतर पूढे काय? अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असे प्रश्न येतात. दहावीनंतर पूढे कशात करिअर करायचे याबबात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते. मात्र, चिंत करू नका. दहावीनंतर मुलींसाठी आयटीआय (ITI After 10th)  हे उत्तम करिअरचा पर्याय असू शकतो. मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला येथे प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रवेश अर्ज दाखल करणे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. अकोला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, दोन वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये सेक्रेटरीयल प्रॅक्टिस, ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट,  इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इ. व्यवसायांना प्रवेश देण्यात येणार आहे. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? रोजगार संधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोर्स पूर्ण झाल्यावर शिकाऊ उमेदवार योजनेमध्ये शिकाऊ उमेदवारी मिळते किंवा खाजगी तसेच शासकीय आस्थापनेवर नोकरीची सुद्धा संधी असून स्वयंरोजगार सुद्धा स्थापन करता येतो. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू इथं होतात. याद्वारे आयटीयातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध होत असून काही मुलींनी ग्रामीण भागामध्ये स्वतःचा बुटीक सुरु केले असून यातून त्या 30 ते 35 हजार रुपये महिना कमावत असल्याची माहिती प्राचार्य राम मुळे यांनी दिली. पात्रता आणि वैशिष्ट्ये प्रवेशासाठी दहावी पास असणे आवश्यक, मुली /महिला करता वयाची अट नाही, जिल्हा, तालुका, राज्याबाहरी देखील मुली /महिला अर्ज करू शकतात, प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होते, पुढील शिक्षणाकरिता पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश, जिल्ह्याबाहेरील किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींसाठी संस्थेमध्ये महिला वसतिगृहाची व्यवस्था, शासनाच्या विविध योजनांचा प्रशिक्षणार्थींना लाभ, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी (आय.एम.सी.) अंतर्गत येणाऱ्या जागेकरीता यावर्षी माफक प्रवेश शुल्क आकारणी.  वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT
   काॅलेज पत्ता
  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला. मनकर्णा प्लॉट, शिवाजी कॉलेज रोड, जुने अकोट स्टॅन्ड, अकोला. येथे विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत, रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने इच्छुक विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : http://admission.dvet.gov.in तर अधिक माहितीसाठी (9075140561, 9922924660) या क्रमांकावर संपर्क करू शकता. Govt Industrial Training Institute, Akola गुगल मॅपवरून साभार मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र मुलींना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी समुदेशन केंद्रही सुरु करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्रात प्रवेश प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती तसेच प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी इच्छुक महिला तथा मुलींनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करावा, असे आवाहन प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे. 
  First published:

  Tags: Akola News, Career opportunities

  पुढील बातम्या