मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola: रसरसीत जांभूळ बाजारात दाखल, जांभूळ खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहितीयेत का?

Akola: रसरसीत जांभूळ बाजारात दाखल, जांभूळ खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहितीयेत का?

X
अकोला

अकोला शहरातील बाजारात रससतील जांभूळं दाखल झालेली आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभुळ ही एक लोकप्रिय फळ आहे. सध्या जांभूळ या फळाची बाजारात आवक सूरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढत असते.

अकोला शहरातील बाजारात रससतील जांभूळं दाखल झालेली आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभुळ ही एक लोकप्रिय फळ आहे. सध्या जांभूळ या फळाची बाजारात आवक सूरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढत असते.

    अकोला, 17 जून : आंबट गोड असा स्वाद असलेल्या आंबा, चिंच, बोरं, जांभूळ अशा रानमेव्याची नावे जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. निरर्गांने या प्रत्येक फळांना चवीसह औषधी गुणधर्माने (Black Jamun Has Many medicinal Properties) समृद्ध केलं आहे. लांबट आणि गोल आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ बाजारात दाखल होतात. सधा बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पण यावर्षी रसरसीत जांभूळाच्या किमतीत वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. 

    वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT

    पावसाळ्यात, काळसर जांभळ्या रंगाच्या जांभूळाचे घड झाडाला लागलेले पाहायला मिळतात. निसर्गानं निर्माण केलेले हे फळ शरीरात अमृतासमान कार्य करतं. वर्षांऋतूत जांभूळ महत्वाचं फळ मानले जातं. गोल, लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो. जांभळामधील काही गुणधर्मांमुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. त्याशिवाय डोळे देखील चांगले राहतात. जांभळामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय ऍन्टीऑक्सीडंन्ट असतं. जांभळात कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असतं.

    हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?

    240 रुपये प्रति किलो भाव

    अकोला शहरातील बाजारात रससतील जांभूळं दाखल झालेली आहेत. उन्हाळ्यातील फळांमध्ये जांभुळ ही एक लोकप्रिय फळ आहे. सध्या जांभूळ या फळाची बाजारात आवक सूरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढत असते. जांभूळ या फळाचा कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो. निसर्गचा लहरीपणा, घटते पर्जन्यमान, वाढती वृक्षतोड यामुळं जांभुळाच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या 240 रुपये प्रति किलो या भावाने बाजारत जांभळाची विक्री होत आहे, 

    अकोला शहरात जळगाव, चिखली, चंद्रपूर, बैतुल, या शहरातून माल येतो. सध्या बैतूलवरुन माल येणास सुरवात झाली आहे.  बैतुलच्या जांभळाची आवक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असते. प्रति किलो 240 रुपये या दराने सध्या जांभूळ विक्री विक्री होत असल्याची माहिती फळ विक्रेता मोहम्मद नदीम यांनी दिली. 

    आरोग्यासाठी अनेक फायदे

    जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ हे गुणकारी असते.जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो, जांभळाचे आरोग्यदायी उपयोग जांभळाचा मोठा फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो. जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रुपांतर ऊर्जेमध्ये होतं. जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो. 

    First published:
    top videos