जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola : अकोला ते खामगाव नॅशनल रोडवरील कठडा भिंतीने शेतीचा रस्ता बंद; रस्ता नसल्याने पेरणी खोळंबल्या, पाहा VIDEO

Akola : अकोला ते खामगाव नॅशनल रोडवरील कठडा भिंतीने शेतीचा रस्ता बंद; रस्ता नसल्याने पेरणी खोळंबल्या, पाहा VIDEO

Akola : अकोला ते खामगाव नॅशनल रोडवरील कठडा भिंतीने शेतीचा रस्ता बंद; रस्ता नसल्याने पेरणी खोळंबल्या, पाहा VIDEO

अकोला ते खामगाव चौपदरीकरणाच्या कामामध्ये रोडच्या कडेला बांधलेल्या कठडा भिंतीमुळे शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून शेतात जाणे अशक्य झाले आहे. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्या आहेत. या भिंतीमुळे शेतामध्ये पावसाचे पाणी देखील साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अकोला, 2 जूलै : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. अकोला ते खामगाव रोडच्या चौपदरीकरणाचे (Akola to Khamgaon National Road) काम जलदगतीने होत आहे. मात्र, या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. चौपदरीकरणाच्या कामामध्ये रोडच्या कडेला बांधलेल्या कठडा भिंतीमुळे शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून शेतात जाणे अशक्य झाले आहे. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील  शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्या आहेत. या भिंतीमुळे शेतामध्ये पावसाचे पाणी देखील साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. शेतकरी (Farmer), स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार दिली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांची समस्या सुटली नसल्याने खरिपाची पेरणी (Kharif Sowing) करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ठेकेदार, अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे वारंवार अधिकारी आणि ठेकेदाराला सांगूनही यावर काही उपाययोजना निघाली नाही. ठेकेदार, अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. रस्त्याबात कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. सध्या खरिपाची पेरणी सुरू आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्या आहेत. माझी देखील शेती या रोडलगत आहे. पेरणीसाठी आणलेले बियाणे घरात पडून आहे. मात्र, रस्त्यामुळे पेरणी झाली नसल्याचे रिधारा येथील उपसरपंच गणेश वाडकर यांनी सांगितले.   वाचा-  बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT

     “पेरणीचं बियाणं घरात येऊन पडलं आहे. पण शेतात न्यायचं कसं?”

    शेतीला रस्ता नसल्याने आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक पडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून या हायवेचं काम सुरू आहे. रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. आता सध्या खरिपाच्या पेरणीचे दिवस सूरू आहेत. पेरणीचं बियाणं घरात येऊन पडलेल आहे. मात्र, शेतात पेरणीसाठी जायला रस्ताच नाही. पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजुला कठडा भिंती आहेत. भिंतीमुळे शेतात पाणी साठून राहत आहे. साठलेल्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. आणि आम्हा शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, असे रिधोरा येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.   हे वाचा -  बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? “शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत लवकरच यावर पर्याय काढला जाईल.” जिल्ह्यात नॅशनल हायवेचे सध्या काम चालू आहे. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या डिव्हायडरमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाहीये. अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत, त्याची चौकशी सुद्धा चालू आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि एस.डी.ओ. यांची एक संयुक्त बैठक बोलावून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात येईल, अशा प्रकारचे निर्देश एसडीओ यांना दिले आहेत, अशी माहिती अकोला उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात