अकोला, 07 नोव्हेंबर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटातील नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलाच कलगीतुरा रंगली आहे. ‘मला पप्पू म्हणताय. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत’ असं ओपन चॅलेंजच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बाळापूर इथं सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी आमदार नितीन देशमुख यांना व्यासपीठावर मिठ्ठी मारली. नितीन देशमुख हे शिंदे गटात न जाता सुरतहून माघारी परतले होते. यावेळी सभेत बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘आम्ही डोळ्यात डोळे टाकून सांगू शकतो आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यातले खरे मुख्यमंत्री कोण आहेत कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी सुरवातीलाच शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्ज मुक्ती केली होती. हे सरकार काही महिन्यात कोसळणार आहे. उद्योग मंत्र्यांचे उद्योग सर्वांना माहिती आहेत. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत, असं चॅलेंजच आदित्य ठाकरेंनी दिलं. (‘अजिबात सहन करणार नाही’, संभाजीराजेंपाठोपाठ राष्ट्रवादीचाही महेश मांजरेकरांना इशारा) ‘आमच्या पाठीत जो खंजीर खुपसला तोच खंजीर जनतेच्या पाठीत खुपसत आहेत. ह्याच्या खुर्च्या चिकटलेल्या आहेत, सोडायला तयार नाहीत. सगळे गद्दार आहेत, ते गद्दार म्हणूनच राहणार आहे. कृषिमंत्री, उद्योग मंत्र्यांसह 40 आमदार हे गद्दार आहे. मी असेल छोटा पप्पू, पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिक राहा. आपल्या राज्यात खूप झाले बंटी बबली झाले आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. (राज ठाकरेंनी आवाज दिलेल्या चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड कराल तर…) ‘राज्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पहिली मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाच आदित्य ठाकरेंनी दिली.