• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING: अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची मोठी कारवाई

BREAKING: अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची मोठी कारवाई

Ed seized Sugar Factory of Ajit Pawar relative: ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी साखर कारखाना जप्त केला आहे.

  • Share this:
मुंबई, 1 जुलै: ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकांचा आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतूपरस्कर असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: