21 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘राणेंची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे’. असं अजित पवार म्हणाले आहेत. मंत्रीपदासाठी भाजपाकडे तगादा लावणाऱ्या नारायण राणे यांची अजित पवारांनी अशी खिल्ली उडवत त्यांच्यावर टिका केली आहे. ‘भाजपनं राणेंना गाजर दाखवलं आहे. भाजपचं निवडणूक चिन्ह बदलून गाजर केलं पाहिजे.’ असा टोलाही अजित पवारांनी लगावला. ते नांदेडमधल्या एका सभेत बोलत होते. ‘राणे आता हताश झाले आहेत. मंत्री करण्यासाठी त्यांनी आता मुख्यमंत्र्याना धमकी दिली आहे.’ राणे म्हणतात, ‘मी मुख्यमंत्री होतो मला मंत्री तरी करा.’ असं म्हणत राणेंची अजित पवारांनी राणेंची खल्ली उडवली आहे. आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची अशी अवस्था केल्याचंही पवार म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची खिल्ली उडवली आहे. ‘जानकरांना त्यांच्या खात्यातलं काहीच कळत नाही.’ अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या अशा बोचऱ्या टीकेवर जानकर आणि राणे काय प्रतिक्रिया देतील हेच बघणं आता महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







