मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

‘चंद्रा’ फेम जयेश खरेची हृदयस्पर्शी कहाणी; वडील ऑर्केस्ट्रामध्ये राबतात, मुलासाठी मोठं स्वप्न

‘चंद्रा’ फेम जयेश खरेची हृदयस्पर्शी कहाणी; वडील ऑर्केस्ट्रामध्ये राबतात, मुलासाठी मोठं स्वप्न

जयेश खरेचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. त्यांच्या घरातील परिस्थिती तशी बेताचीच आहे.

जयेश खरेचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. त्यांच्या घरातील परिस्थिती तशी बेताचीच आहे.

जयेश खरेचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. त्यांच्या घरातील परिस्थिती तशी बेताचीच आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
अहमदनगर, 18 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील एका मुलाच्या ‘चंद्रा’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला भूरळ लावली आहे. पल्लेदार आवाज असलेल्या या जयेशचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोक त्याच्या आवाजाचं कौतुक करीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चिमुकल्या जयेशच्या गाण्याने सर्वांना भुरळ घातली आहे. राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावात राहणार जयेश खरे याच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परिस्थितीमुळे स्वतःला मोठं गायक होता आलं नाही मात्र आपल्या मुलाला मोठा गायक करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न आहे. जयेशमध्येही चांगला गायक होण्याची गुणवत्ता आहे. त्याला सुराची समज आहे. आवाजात खोलपणा आहे. त्याला वेळीच योग्य संधी मिळाली तर जयेश आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करील याबाबत काहीच शंका नाही. शाळकरी मुलाच्या 'चंद्रा'नं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, सूर असा की अंगावर येतील शहारे, पाहा Video हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा आहे. ज्याचं गाणं तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. हा मुलगा आपल्या वर्गात गाणं गताना दिसत आहे. हा मुलगा लावणी गात आहे. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो लोकांना फारच आवडला. हा व्हिडीओ काहीच तासाच सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. ज्यावर लोक भरभरुन लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
First published:

पुढील बातम्या